वाळूज महानगर : लग्नाच्या वाढदिवशीच पत्नी व मुलीचा खून करून पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी वळदगावात घडली. या घटनेत मोहन प्रताप डांगर (२९), पत्नी पूजा डांगर (२५) व मुलगी श्रेया (५) हे तिघे मयत झाले असून, कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मोहन हा पत्नी पूजा व मुलगी श्रेया यांच्या सोबत वळदगावात चार महिन्यांपासून भाड्याने राहत होता. गुरुवारी रात्री तिघांनीही घरालगतच राहणारी पूजाची आई शोभाबाई मेहर यांच्या घरी जेवण केले. शुक्रवारी सकाळी ९ वाजले तरी नात श्रेया ही आजी शोभाबाई यांच्याकडे न आल्याने त्या जावई मोहन डांगरच्या घरी गेल्या.