पिंपरी : अल्पवयीन मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असा मेसेज सोशल मीडयावरून पाठविला. तसेच मुलीने आत्महत्या करावी अन्यथा जीवे मारू, अशी धमकी दिली. मुलीच्या पालकांच्या आणि मुख्याध्यापकांच्या ई-मेलवर देखील ही धमकी दिली. मोशी येथे १५ जून ते १२ डिसेंबर २०२० दरम्यान हा प्रकार घडला.
मोशी येथील ४२ वर्षीय महिलेने याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. फिर्यादी यांच्या अल्पवयीन मुलीच्या झूम अॅपवर, तसेच तिचे वडील आणि शाळेच्या मुख्याध्यापकांच्या ई-मेलवर आरोपी याने अश्लील मेसेज पाठविला. त्यामुळे मुलीच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन आरोपीने तिचा विनयभंग केला. अल्पवयीन मुलीने आत्महत्या करावी, अशी धमकी दिली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने मुलीला धमकावले.