शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर तीन दिवस आळीपाळीनं बलात्कार, आरोपी बाबाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 5:57 PM

हरयाणातल्या पंचकुला पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी स्वयंभू बाबाला अटक केली आहे.

पंचकुलाः हरयाणातल्या पंचकुला पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपी स्वयंभू बाबाला अटक केली आहे.  बलात्काराच्या प्रकरणात आरोपी असलेला बाबा स्वामी लक्ष्यानंद सरस्वती पंचकुलाच्या रायपुरानीतल्या त्रिलोकपूरमध्ये लक्ष्यानंद आश्रम चालवतो.  पोलिसांनी हिमाचलच्या बद्दीतल्या दोन मुलींच्या तक्रारीवरून आरोपी बाबाविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. दोन्ही मुली आश्रममध्ये सेवा करण्यासाठी छोटा त्रिलोकपूरमध्ये गेल्या होत्या. ज्यांच्याबरोबर कथित स्वरूपात तीन दिवस आळीपाळीनं बलात्कार करण्यात आला.पंचकुला महिला पोलीस ठाण्याचे अधीक्षक नेहा चौहान यांनी प्रकरणाची खात्री केलेली असून, पीडित मुलींची वैद्यकीय चाचणीसुद्धा करण्यात आली होती. पोलिसांना आता वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी आरोपी बाबाला अटक केल्यानंतर त्याच्या अनेक ठिकाणांवर छापेमारी केली. तो बाबा प्रत्येक रविवारी स्वतःच्या आश्रमात मोठी गर्दी जमवत होता. त्यात अनेक महिलांचाही समावेश असायचा.  एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, बाबाच्या हालचाली संशयास्पद होत्या. परंतु या बाबांवर स्थानिक लोकांची श्रद्धा आहे. बाबाला अटक केलेली असून, लवकरच त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं जाणार आहे. तसेच बाबानं आणखी काही महिलांबरोबर असं गैरकृत्य केलेलं आहे का?, हे तपासातूनच उघड होणार आहे.