शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

मुंबईनंतर नाशकातही 'सेक्सटॉर्शन'चा धक्कादायक प्रकार; तरुणाला अश्लीलतेच्या जाळ्यात अडकवून उकळले ११ हजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2021 2:38 PM

फेसबुक असो किंवा अन्य कोणतेही सोशल ॲप यावरुन जर अनोळखी व्यक्ती आपल्याला मैत्रीची विनंती पाठवित असेल तर हे एक फसवणूकीचे जाळे फेकले गेले आहे आणि अश्लीलता हाच त्याचा केंद्रबिंदू समजून त्याकडे दुर्लक्ष करत असे मैत्रीचे प्रस्ताव धुडकावून लावण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे.

ठळक मुद्देपोलीस अधीक्षकांनी दिला सोशलमिडियावर सावधगिरीचा इशाराअश्लीलता हाच केंद्रबिंदूमहिलेच्या नावाने अकाउंट वापरणारे अनेकदा पुरुष असतातशारिरिक लोभाचे आमीष

नाशिक :सोशल मीडियाद्वारे अनोळखी कथित महिलांकडून ह्यफ्रेन्ड रिक्वेस्टह्ण पाठवून ओळख करुन घेत मैत्री वाढवून नंतर अश्लील चॅटींग व व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकविण्याचा अर्थात सेक्सटॉर्शन करण्याचा प्रकार राज्यातील मुंबई, पुणे, नागपूरपाठोपाठ नाशिक जिल्ह्यातसुध्दा घडल्याचे उघडकीस आले आहे. पिंपळगाव बसवंत परिसरात एका तरुणाची अशाप्रकारे आर्थिक फसवणूक झाली आहे. या पार्श्वभुमीवर पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सोशलमिडियावर याबाबत सावधगिरीचा इशारा दिला आहे.

नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर सेक्सटॉर्शनचा प्रकार आल्यामुळे ग्रामीण पोलिसांचे सायबर सेल सतर्क झाले आहे. सचिन पाटील यांनी सायबर सेलला सतर्क राहून अशा टोळीचा पर्दाफाश करण्याबात आदेशित केले आहे. तसेच ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जनप्रबोधनात्मक पोस्टदेखील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून व्हायरल करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कुठेही अशाप्रकारे जर आर्थिक फसवणूक कोणाची झाली असेल तर त्यांनी निसंकोचपणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलीसांकडे येऊन तक्रार द्यावी. संबंधित तक्रारदार व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पाटील यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले.सोशल मीडियाचे प्रत्येक ॲप्लिकेशन अत्यंत सतर्कतेने आणि प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यपणे सक्रीय करुन वापरण्यास प्राधान्य द्यावे तसेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापुर्वी योग्य ती पडताळणी अवश्य करुन घ्यावी. व्हॉट्सॲप , फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे तसेच गुगलकडून हे ॲप्लिकेशन वापरता अचानकपणे अनोळखी डेटिंग ॲप्लिकेशनच्या दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींना बळी न पडता डेटींग ॲपची जाहिरात ब्लॉक करावी आणि असे ॲप्लिकेशन तरुणांनी विरुध्दलिंगी आकर्षणापोटी अजिबात डाऊनलोड करु नये असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.अश्लीलता हाच केंद्रबिंदूफेसबुक असो किंवा अन्य कोणतेही सोशल ॲप यावरुन जर अनोळखी व्यक्ती आपल्याला मैत्रीची विनंती पाठवित असेल तर हे एक फसवणूकीचे जाळे फेकले गेले आहे आणि अश्लीलता हाच त्याचा केंद्रबिंदू समजून त्याकडे दुर्लक्ष करत असे मैत्रीचे प्रस्ताव धुडकावून लावण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अनेकदा विरुध्दलिंगी आकर्षणापोटी तरुण किंवा तरुणी या जाळ्यात अडकून आपली आर्थिक फसवणूक करुन घेण्यास कारणीभूत ठरतात. तुमच्याशी चॅटींग किंवा व्हीडिओ कॉल करणारी व्यक्तीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे ब्लॅकमेलिंग हे लक्षात घ्यायला हवे, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयSocial Mediaसोशल मीडियाsexual harassmentलैंगिक छळ