नवी दिल्ली : देशातील विविध बँकांना हजारो कोटींचा चुना लावून पसार झालेला किंगफिशरचा उद्योगपती विजय मल्ल्याच्या (Vijay Mallya) प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र, त्याच्या खटल्याची कागदपत्रे फआीलमधून गायब झाल्याने न्यायालयाने सुनावणी टाळली आहे. माल्या सध्या लंडनमध्ये राहत आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या कारणाने अवमान केल्याचा ठपका ठेवला आहे. यावर माल्याने पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी होणार होती. मात्र, कागदपत्रे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने न्यायालयाने ही सुनावणी 20 ऑगस्टपर्यंत पुढे ढककली आहे. तीन वर्षांपूर्वी मल्याने ही याचिका दाखल केली होती.
2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मल्ल्याला अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरविले होते. मल्ल्याने न्यायालयाच्या आदेशांच्या विरोधात जात त्याची संपत्ती कुटुंबियांच्या नावे केली होती. या प्रकरणी माल्ल्याने याचिका दाखल केली होती. गेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने आपल्याच रजिस्ट्री अधिकाऱ्यांना ही याचिका अद्याप न्यायालयासमोर का आली नाही, असा प्रश्न विचारला होता. तसेच संबंधित अधिकाऱ्यांची नावेही विचारली होती. आता या याचिकेबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
9 हजार कोटी घेऊन पसारविजय मल्ल्या हा 2 मार्च 2016 मध्ये कोणालाही खबर लागू न देता देशाबाहेर पळाला होता. ब्रिटेनचे पोलीस स्कॉटलंड यार्डने त्याला 18 एप्रिल, 2017 मध्ये अटक केली होती. मात्र, तेथील न्यायालयाने त्याला काही तासांतच जामिनावर सोडले होते. तेथील न्यायालयात मल्ल्याच्या प्रत्यार्पणावर सुनावणी सुरु आहे. त्याच्यावर 17 बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज आहे.
अन्य़ महत्वाच्या बातम्या...
'चुकीला' माफी नाही! राष्ट्राध्यक्ष का असेना; फेसबुकने डोनाल्ड ट्रम्प यांची 'ती' पोस्ट उडवली
Reliance चा अटकेपार डंका; बनला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड, Appleचे स्थान धोक्यात
Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार
Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित
सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...
कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू
आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका