शाहदारा जिल्ह्यातील मानसरोवर पार्क परिसरात एका युवकाने आपल्या पत्नीचे लग्नाच्या वाढदिवसादिनी शुभेच्छा दिल्या नाही. याचा त्याला राग आला आणि लग्नाच्या वाढदिवसादिवशी गळफास लावून तिने आत्महत्या केली.
आकांक्षा (२७) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांना माहिती मिळाली की, घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. त्याचवेळी मृत महिलेच्या माहेरच्या लोकांनी हुंड्यामुळे छळ केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांव्यतिरिक्त क्षेत्रीय एसडीएमदेखील या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांक्षा नत्थू कॉलनी परिसरात कुटुंबासमवेत राहत होती. आकांक्षा ही सरकारी शाळेत शिक्षिका होती, तर पती अंकित एका खासगी कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतात. 11 मे 2018 रोजी दोघांचे लग्न झाले होते. आकांक्षाची आई संतोष देवी यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी तिच्या सासरच्या लोकांनी तुम्ही ताबडतोब घरी यावे, आकांक्षा तुमच्याशी बोलू इच्छित आहे, असे सांगितले. घरी पोहोचताच तिच्या मृत्यूची बातमी मिळाली. सासरच्यांनी सांगितले की, आकांक्षाने स्वत: ला फास लावून आत्महत्या केली.
अंकितने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सांगितले की, सोमवारी त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे, तो आपल्या पत्नीला शुभेच्छा देण्यास विसरला. याचा राग आल्यावर आकांक्षाने हे पाऊल उचलले. त्याचवेळी आकांक्षाच्या आईने आरोप केला की, तिच्या मुलीला तिच्या सासरच्या घरात त्रास देण्यात आला. सासरचे लोक जबरदस्तीने मुलीचा पगार काढून घेत असत. यासह तिला मूल नसल्याने टोमणे मारत असत. आकांक्षाच्या नातेवाईकांच्या आरोपांचा पोलिस तपास करत आहेत. मंगळवारी शवविच्छेदनानंतर आकांक्षाचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात
धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या
Video : लॉकडाउनमध्ये पोलिसाची ड्युटी सोडून 'सिंघम' गिरी, धाडली कारणे दाखवा नोटीस