गुजरातमध्ये एका महिला डॉक्टरने आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात झोपेच्या अधिक गोळ्या खाण्यापूर्वी आपल्या आई आणि बहिणीला विषारी औषधाचं इंजेक्शन देऊन त्यांची हत्या केली. तर आरोपी महिला डॉक्टरचा जीव वाचला. पोलिसांनी रविवारी सांगितलं की, डॉ. दर्शना प्रजापती(३०) ने शनिवारी रात्री तिची आई मंजुलाबेन (५९) आणि बहीण फाल्गुनी(२८)ला विषारी इंजेक्शन दिलं. ज्यात रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, डॉक्टरने झोपेच्या गोळ्या खाऊन आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पण ती वाचली. सध्या तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अधिकारी डीजे चावडा म्हणाले की, 'मंजुलाबेन आणि फाल्गुनी दोघांचा मृत्यू जास्त प्रमाणात ड्रग्स घेतल्याने झाला आहे. तर डॉ. दर्शनावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे'. (हे पण वाचा : मुलीसमोरच बॉयफ्रेन्डने केली आईची हत्या, मग मृतदेह सूटकेसमध्ये भरून....)
का केलं असं?
डॉ. दर्शनाने पोलिसांना सांगितलं की, ती तिच्या जीवनाला वैतागली होती. चावडा म्हणाले की, 'डॉक्टरची आई आणि तिची बहीण दोघीही डॉक्टरव अवलंबून होत्या. त्यामुळे तिने स्वत:ला संपवण्याआधी त्यांचा जीव घेतला. ती म्हणाली की, त्यांना विषारी ड्रग्सचं इंजेक्शन तिनेच दिलं होतं'.
डॉ. दर्शना आई, बहीण, भाऊ आणि वहिनीसोबत सहजानंद सोसायचीमध्ये राहत होती. घटनेवेळी तिचा भाऊ आणि वहिनी घरातून बाहेर गेले होते. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांनी डॉक्टरचा जबाब नोंदवला असून पुढील कारवाई करत आहेत.