इंग्लंडमध्ये एका महिलेने तिच्या ८१ वर्षीय पतीवर उकळतं पाणी टाकलं. ज्यानंतर त्याचा मृत्यू झाला. ५९ वर्षीय कोरिना बेंस गेल्या ३८ वर्षांपासून या व्यकक्तीसोबत संसार करत होत्या. मात्र, ती पतीच्या एका गोष्टीवर नाराज झाली होती. आता कोरिनाला याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.
याप्रकऱणी मेट्रो वेबसाइटसोबत बोलताना डिटेक्टिव चीफ इन्स्पेक्टर पॉल ह्यूज म्हणाले की, कोरिनाने पतीवर केवळ पाणीच टाकलं नाही तर त्यात तीन किलो साखरही मिश्रित केली होती. यावरून हे स्पष्ट होतं की, या महिलेला पतीला जास्त वेदना द्यायची होती. उकळत्या पाण्यात साखर फार घातक होते. (हे पण वाचा : लग्न लागणार इतक्या नवरदेवाला घेऊन गेले पोलीस, त्याच्या लहान भावासोबत लावून दिलं नवरीचं लग्न)
ते पुढे म्हणाले की, पतीवर हल्ला केल्यावर महिलेने अॅम्बुलन्स बोलवली आणि त्यानंतर शेजाऱ्यांकडे गेली. त्यांना ती कॉफी मागत होती. या महिलेला तिच्या चुकीची जाणीव होत होती आणि ती घाबरत सांगत होती की, तिच्याकडून चूक झाली. तिने कदाचित तिच्या पतीला मारलं. जर ती पॅनिक झाली नसती आणि अॅम्बुलन्स बोलवली असती तर तिचा पती वाचला असता.
कोरिना आपल्या मुलीसोबत शॉपिंगला गेली होती. पण तिच्या पतीने तिला लवकर घरी बोलवून घेतलं होतं. रिपोर्टनुसार, कोरिनाच्या पतीने तिला काही कामानिमित्त घरी लवकर बोलवलं होतं. कोरिना त्यावेळी तर काही म्हणाली नाही, पण तिला या गोष्टीचा खूप राग आला होता. यानंतर महिलेने दोन भांड्यात पाणी उकळलं आणि त्यात काही किलो साखर टाकली. हे पाणी तिने एका बकेटीत टाकलं. त्यानंतर ते झोपलेल्या पतीवर ओतलं. यानंतर पतीचं शरीर याने बरंच भाजलं आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.