भिवंडी - मीरा भाईंदर येथील एका भामट्याने भिवंडीतील मोबाईल दुकानदाराला मोबाईल होलसेल दरात देतो असे सांगून दुकानदाराकडून ऑनलाईन 2 लाख 82 हजार रुपये घेऊन गंडा घातल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. आदिल शहाबुद्दीन अन्सारी (32 ) असे फसवणूक झालेल्या मोबाईल दुकानदाराचे नाव आहे. त्याचे शहरातील हिंदुस्थान मस्जिदीजवळ 'मदनी मोबाईल शॉप नावांचे दुकान आहे. या प्रकरणी मोबाईल भामट्याविरोधात भोईवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिग्नेश जयंतीलाल कवरलाल रा .मीरा भाईंदर असे फसवणूक करणाऱ्या भामट्याचे नाव आहे.त्याने आदिल शहाबुद्दीन अन्सारी(32) हा मोबाईल दुकानात असताना त्यास फोन करून "मेरा नालासोपारा मे ' हरिओम मोबाईल शॉप एजन्सी ' नाम का होलसेल का दुकान, है वहा से मै होलसेल और सस्ते में मोबाईल चाहीए तो आप मेरे दुकान से मोबाईल ले सकते हो,लेकीन आपको पहले मेरे अकाउंट में पैसा डालना पडेगा असे सांगितले. मोबाईल स्वस्त दरात मिळतात या लालसेने आदिलने आय.एम.पी.एसद्वारे ऑनलाईनने जिग्नेशला 2 लाख 82 हजार रुपये पाठवले. त्यानंतर मोबाईलची मागणी केली असता जिग्नेशने आदिलला कोणत्याही प्रकारचे मोबाईल दिले नाही. त्यामुळे आदिलने पैसे परत मागितले मात्र पैसे परत देण्यासाठी वेगवेगळे बहाणे करून टाळाटाळ करू लागला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे आदिलच्या लक्षात आल्याने त्याने भोईवाडा पोलिस ठाण्यात जिग्नेश याच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या फसवणुकीच्या गुन्ह्याचा पुढील तपास भोईवाडा पोलीस ठाण्याचे(गुन्हे) पोलीस निरीक्षक एन.पी.पवार करीत आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मुंबई पोलिसांकडून सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबावर दबाव; वकीलाने लावला गंभीर आरोप
लोअर परेल येथून २१ लाख किंमतीच्या बनावट एन -९५ मास्कचा साठा जप्त
स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश
...म्हणून बिहार पोलिसांचे पथक मुंबईत धडकल्याने रियाने घेतली सुप्रीम कोर्टात धाव
भिवंडीत मित्रांसोबत पोहायला गेलेल्या इसमाचा मृत्यू
Video : लेकीसाठी आई चक्क चढली एसपी कार्यालयासमोरील झाडावर अन् केला आत्महत्येचा प्रयत्न
खळबळजनक! गवळी गँगच्या हस्तकाची तळोजा कारागृहात आत्महत्या
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...