लोणी काळभोर : लोणी काळभोर येथे दुसरे वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने आलेल्या हलाखीच्या परिस्थितीचा फायदा उठवत अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी तब्बल सहा महिने बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. तसेच सदर बाब कोणास सांगितली तर आईसह मुलीला जीवे मारण्याची धमकी देणा-या मूर्तिकारास पोलिसांनीअटक केली आहे. याप्रकरणी पंधरा वर्षीय पीडित मुलीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.रूपेश अनंत उघडे (वय ३०, सध्या रा. कुंजीरवाडी ता. हवेली, मुळ रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्यौ मूर्तिकाराचे नाव आहे. पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१७ मध्ये सदर पीडित मुलीचे दुसरे वडील सोरतापवाडी येथे रूपेश उघडे याच्या मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात कामाला होते. त्यामुळे मुलगी डबा घेऊन कारखान्यात जात असे. तसेच उघडे हा तिच्या वडिलांसमवेत सतत घरी जात होता. वडील मुलीला वारंवार मारहाण करत असत. जानेवारी २०१८ मध्ये वडील घरखर्चासाठी पैसे देत नसल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची झाली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रूपेश उघडे याने त्याचा फायदा उठवला व त्या मुलीला भेटून तुझा पत्नीप्रमाणे तुज्या आईसह सांभाळ करेन असे सांगून खोलीत नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सदर प्रकारांची पुनरावृत्ती जून २०१८ पर्यंत वारंवार होत होती. सदर व्यक्ती आपल्या असाह्यतेचा फायदा उठवत आहे हे त्या पिडीत मुलीच्या लक्षात आले नंतर तिने विरोध केला. यावेळी त्याने आईसह तिला जिवे ठार मारण्याची धमकी दिली. विद्यालयात नववी इयत्तेत शिक्षण घेण्यास सुरुवात केल्यानंतर उघडे हा तिची शाळा भरताना व सुटताना तो तेथे जावून तिला भेटण्याचा प्रयत्न करत असे. तसेच त्यावेळी शरीरसंबंधाबाबत कोणास काही सांगू नकोस असे म्हणून शरीरसंबंधाची मागणी करून त्रास देत होता. यामुळे सदर पीडित मुलगी शाळा सुटेपर्यंत वर्गांत न थांबता घरी जात होती. त्यामुळे तिला शाळेतून काढून टाकण्यात आले. सदर घटनेची कल्पना तिने आईला दिली. स्पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पिंगूवाले, पोलीस हवालदार नितिन सुद्रीक, प्रविण सांगळे यांनी मुळ गावी निघालेल्या रूपेश उघडे याला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान या करत आहेत.
अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवत बळजबरीने शरीरसंबंध ठेवणाऱ्या मूर्तिकारास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2019 2:39 PM