वसईच्या तरुणीची दिल्लीत हत्या प्रकरणात वेगवेगळे खुलासे होत आहेत. आफताब पुनावाला या तिच्या बॉयफ्रेंडने श्रद्धाची हत्या केल्याचे कबुल केले आहे. असे असताना पोलिसांनी आफताबचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. याच्या तपासात आफताब श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून नवीन प्रेमसंबंधांसाठी तरुणी शोधत होता हे समोर आले आहे.
आफताबने श्रद्धाचे तुकडे फ्रीजमध्ये असताना दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत घरात मौजमजा केल्याचे समोर आले आहे. आफताबने श्रद्धाचा देह ३५ तुकड्यांमध्ये कापला होता. हे तुकडे ठेवण्यासाठी नवा फ्रिजही घेतला होता. रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत त्याने हे तुकडे १८ दिवस जवळच्याच जंगलात जात जाळले व नष्ट केले होते.
आफताब याकाळात नवीन तरुणी गळाला लागते का हे पाहत होता. यासाठी आफताब Bumble या डेटिंग अॅपद्वारे दुसऱ्या तरुणीला डेट करत होता. हे एक ऑनलाइन डेटिंग अॅप आहे. युजरला त्याच्या आवडीनुसार मॅच मिळते. तुम्ही डावीकडे स्वाइप करून नकार देता येतो, तर उजवीकडे स्वाईप केले की होकार कळविता येतो.
अशाप्रकारे गुन्हेगारांकडून डेटिंग अॅपवर सापळा रचला जातो. यासाठी Match, eharmony, Hinge, OkCupid, AdultFriendFinder, Tinder आणि HER सारखी अॅप वापरली जातात. ही अॅप फोनमध्ये आरामात डाऊनलोड देखील करता येतात. यामुळे मुलींनी आणि पालकांनी सावध राहण्याची गरज आहे.