मुंबईतील श्रद्धा वालकर हत्याकांड सारखेच एक हत्याकांड समोर आले आहे. हे प्रकरण पालघर येथील आहे, पालघर येथील तुळींज येथे ४० वर्षीय पत्नीची हत्या करुन पती फरार झाला होता. काही दिवसांनी मृतदेहाचा दुर्गंधीनंतर शेजाऱ्यांना वास येऊ लागल्यानंतर हे प्रकरण समोर आले. हार्दीक शहा असं या आरोपी पतीचे नाव आहे. पती पत्नीमध्ये नेहमी वाद रागाच्या भरात पतीने पत्नीची हत्या केल्याचा खुलासा झाला आहे. हत्येनंतर मृतदेह पलंगाखाली लपवून आरोपी पती फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली. आरोपीला मध्यप्रदेशमध्ये रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली. या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्या झालेल्या पत्नीचे नाव मेघा शहा असं आहे. मेघा या पेशाने परिचारिका होत्या. सोमवारी तुलिंज परिसरात त्या राहत असलेल्या भाड्याच्या घरात मृतावस्थेत आढळून आल्या. मृतदेहाची दुर्गंधी पसरली होती. यामुळे या घटनेची माहिती शेजाऱ्यांना मिळाली. बेडमध्ये हा मृतदेह लपवून ठेलल्याचे समोर आले. ही हत्या गेल्या आठवड्यात झाली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपीने घटनेचा खुलासा केला आहे. आरोपी पती आणि पत्नीमध्ये प्रत्यवेळी वाद व्हायचे. एक दिवस वाद झाला या वादात रागाच्या भरात आरोपीने पत्नीची हत्या केली. ही हत्या केल्यानंतर पतीने घरातील वस्तू विकत होता. याप्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
पत्नीची हत्या करणार्या आरोपी पतीला राजस्थानमधून अटक; धावत्या रेल्वेतून केलं जेरबंद
आरोपी पती बेरोजगार होता आणि याच कारणावरून या दोघांच्यात वाद होत होते. आरोपीने आपल्या बहिणीलाही हत्येचा मेसेज करून घरातून बाहेर पडण्यापूर्वी सर्व फर्निचर विकले होते. तुळींज पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.