दोन दिवसापूर्वी मुंबईतील तरुणी श्रद्धा हिची दिल्लीत हत्या झाल्याचे समोर आले. श्रद्धा दिल्लीतील मेहरौलीमध्ये लिव्ह-इन मध्ये आफताब नावाच्या तरुणासोबत सोबत राहत होती. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केल्याचे समोर आले. फ्रीजमध्ये ठेवलेले श्रद्धाचे शीर त्याने शेवटपर्यंत फेकून दिले नव्हते. या संदर्भात आफताबने अनेक मोठे खुलासे केले आहेत.
फ्रिजमध्ये ठेवलेले श्रद्धाचे छिन्नविछिन्न शीर पाहून त्याला अनेकदा त्याच्या प्रेमाची आठवण येत होती. आरोपी आफताबला घेऊन पोलिसांनी मंगळवारी दिवसभर छतरपूरच्या जंगलात श्रद्धाच्या शीरचा शोध घेतला, पण यात पोलिसांना अपयश आले. (Shraddha Murder Case)
आफताब पूनावाला याने केलेल्या गुन्हाचा तपास पोलीस करत आहेत. येत्या काही दिवसांत त्याची नार्को टेस्टही होणार आहे. आतापर्यंत झालेल्या चौकशीत आफताबने श्रद्धाचा गळा आवळून तिच्या शरीराचे ३५ तुकडे केल्याची कबुली दिली आहे. श्रद्धाचे शीर सापडल्यास आफताबची शिक्षा आणखी घट्ट होईल असं सांगण्यात येत आहे. मृतदेहाची ओळख त्यावरुन होणार आहे. सुपरइम्पोझिशन तंत्रज्ञानाद्वारे ओळख पटवली जाते.
कित्येक दिवस शीर फ्रीजमध्ये ठेवले होते
हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. पण , त्याने शीराचे तुकडे केले नाहीत. त्याने शीर फ्रीजमध्ये ठेवले होते. तो रोज रात्री 2 वाजता मृतदेहाचे इतर भाग फेकत राहिला, पण त्याने शेवटचे शीर ठेवले. फ्रिज उघडताच त्याला श्रद्धाच्या शीराकडे पाहून त्याला आपले प्रेम आठवायचे, असं आफताबने चौकशीदरम्यान पोलिसांना सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीर सापडल्यानंतर मृताची ओळख पटवली जाईल. सध्या पोलीस श्रद्धाचे वडील विकास वाकर यांचा डीएनए जुळवून मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. डीएनए सॅम्पलिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल काही दिवसांत येऊ शकतो.
श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना आफताबने दुर्गंधी येऊ नये म्हणून अनेक रसायनांचा वापर केला. त्याने ऑर्थोबोरिक अॅसिड फॉर्मल्डिहाइड आणि सल्फ्यूरिक अॅसिड मिळवले होते. आफताबने चौकशीदरम्यान सतत आपले जबाब बदलले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या गुन्ह्यातून सुटण्यासाठी आफताबने अत्यंत हुशारीने मृतदेहाची दिल्लीच्या वेगवेगळ्या भागात विल्हेवाट लावली. मंगळवारी पोलिसांना मृतदेहाचा आणखी एक भाग सापडला. त्याची माहिती फॉरेन्सिक तपासणीनंतरच समोर येणार आहे. आफताब पूनावालाने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने हे तुकडे १०० फूट एमबी रोड, स्मशानभूमीजवळील नाल्यात, मेहरौली जंगल आणि छतरपूरमधील पॅडी मिल परिसरात फेकले होते.