नवी दिल्ली : श्रद्धा वालकर खून प्रकरणात पोलिसांना अद्याप तीन प्रमुख पुरावे सापडण्याची प्रतीक्षा आहे. श्रद्धाची हत्या केली ते शस्त्र, तिचे शिर आणि मोबाईल हे ते तीन पुरावे. दरम्यान, आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. त्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने चौकशीदरम्यान सांगितले की, त्याने तिला ठार मारले त्याच्या १० दिवसांपूर्वीच तिला मारले असते. परंतु, भांडणानंतर श्रद्धा भावुक झाली. त्यामुळेच त्याने खून करण्याचा बेत रद्द केला. श्रद्धाने त्याला फोनवर एका मुलीशी बोलताना ऐकले होते, त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले होते, असे समोर आले आहे.
वडिलांना दिल्लीला बोलावण्याची शक्यताश्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या स्वयंपाकघरातून पोलिसांना रक्ताचे डाग सापडले आहेत. पोलिसांनी सोमवारी रात्री आफताबला त्याच्या फ्लॅटमध्ये क्राइम सीन रिक्रिएशनसाठी नेले होते. दरम्यान, त्याच्या स्वयंपाकघरात रक्ताचे डाग आढळले. रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येत आहेत. पोलिस श्रद्धाच्या वडिलांना डीएनए ताडून पाहण्यासाठी दिल्लीला बोलावू शकतात. साकेत न्यायालयाने मंजुरी दिल्यानंतर आता दिल्ली पोलिस आफताबची नार्को टेस्ट करू शकतात.फोटोला ‘हॅपी डेज’ कॅप्शनश्रद्धा वालकर इन्स्टाग्रामवर फारशी सक्रिय नव्हती. तिच्या हत्येच्या एक आठवडा आधी, तिने हिमाचल प्रदेशमध्ये स्वतःचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र पोस्ट केले होते. १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी तिने आफताबसोबत एक फोटो पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले ‘’हॅपी डेज’’. आफताबसोबत तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा एकमेव फोटो होता.
अशी केली हुशारी?nश्रद्धा वालकर खून प्रकरणात तिने एक मोठी घोडचूक केल्याचे उघडकीस आले आहे. श्रद्धा आणि आफताब वसईत राहत असताना त्यांच्यात वाद सुरू झाला होता.n मदतीसाठी तिने तिचा शालेय मित्र लक्ष्मण नाडर याच्याकडे धाव घेतली होती. तेव्हा नाडरने आफताबला पोलिसांत जाण्याची धमकी दिली होती. परंतु, नंतर श्रद्धानेच त्याला तसे करण्यापासून रोखले होते. nनाडरने फोन केला. त्याने श्रद्धा घर सोडून निघून गेल्याचा कांगावा केला. nनाडरला शंका आल्याने त्याने पोलिसांत तक्रार देऊ, असे सांगितले. त्यावर श्रद्धा राग शांत झाल्यावर घरी येईल, ती येताच तुला कळवतो, असे म्हणत त्याने नाडरला पोलिसांत जाण्यापासून रोखले होते. यानंतर आफताबने कधीही संपर्क केला नाही, अशी माहिती नाडरने दिली.