नवी दिल्ली - दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांड सध्या देशभरात चर्चेत असून त्यावर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. श्रद्धाला न्याय मिळावा यासाठी सोशल मीडियात ट्रेंड सुरू आहे. अशात काही लोक आफताबच्या बचावातही उतरले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप वेगाने व्हायरल होत आहे. ज्यात माणसाचा मूड खराब होता तेव्हा तो ३५ काय ३६ तुकडेही करू शकतो असं म्हटला आहे. व्हिडिओत राशिद खान नावाचा एक युवक जो स्वतःला बुलंदशहरचा रहिवासी म्हणवतोय. तो आफताबच्या समर्थनार्थ असं म्हणत होता.
या व्हिडिओमध्ये एका महिलेने त्याला विचारले की, हे किती योग्य आहे? तेव्हा युवक म्हणाला की कधीकधी असे होते. माणसाला राग आला की तो ३५ काय ३६-३७ तुकडेही करेल. मोठ्या उद्दामपणाने त्याने हे विधान केले. जसं एखाद्या व्यक्तीचे तुकडे करणं मोठे काम नाही. चाकू घ्या आणि कापत जा. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एसएसपींनी याबाबत चौकशी सुरू केली आहे, मात्र अद्याप त्या तरुणाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. दुसरीकडे हिंदुत्ववादी संघटनांनी यावर संताप व्यक्त करत कठोर कारवाईची मागणी करत गुन्हा दाखल करण्यास म्हटलं आहे.
दुसरीकडे, मुंबईतील श्रद्धा वालकर खून प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपी आफताब पूनावाला याला साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले. न्यायालयाने आरोपी आफताबच्या पोलीस कोठडीत पुढील चार दिवसांची वाढ केली आहे. विशेष सुनावणीत आफताबला न्यायालयात हजर करण्यात आले. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं. मात्र आफताबला कोणीतरी भडकवलं देखील असेल. त्यामुळे त्याला भयंकर राग आला आणि त्याच्या हातून हत्या झाली. तसेच या घटनेत तिसरा व्यक्तीचाही समावेश असू शकतो, असा अजब दावा आफताबच्या वकिलांनी केला आहे. या हत्येबाबत दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, तूर्तास ही याचिका फेटाळण्यात आली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"