काल पालघरमधील श्रद्धा वाकर या मुलीच्या हत्येची घटना उघडकीस आली. आरोपी आफताब पूनावाला याने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन हत्या केल्याचा धक्कादायक खुलासा झाला. ही खळबळजनक घटना दिल्लीत घडली. आफताब हा पहिल्यापासून क्रुर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता का अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. आफताबचे कुटुंब मुंबईत राहते. त्याने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्याचे कधीही कुणासोबत भांडण झाले नसल्याची माहिती समोर आली आहे.
त्याच्या वडील अमीन यांची आफताबने शिक्षण घ्यावे अशी इच्छा होती, पण त्याने पदवीचे शिक्षण अपूर्ण सोडले. त्याला व्यवसाय करायचा होता आणि वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण सोडून दिल्लीला गेला.
आफताबने एका मुलीची हत्या केल्याच्या बातमीवर अगोदर त्याच्या मित्रांनी विशावस ठेवला नाही, त्याच्या एक मित्राने या संदर्भात माहिती दिली. आफताब आयुष्यात काय करायचं या संभ्रमात होता. आफताबच्या वडिलांनाही त्याच्या भविष्याची काळजी वाटत होती, असंही आफताबच्या मित्राने सांगितले.
मी तुमची मुलगी आहे हे विसरून जा...; आफताबच्या प्रेमात वेडी झालेल्या श्रद्धाने वडिलांचे ऐकले नाही
आफताबच्या कुटुंबीयांनी त्याला श्रद्धासोबत संबंध ठेवण्यास नकास दिला होता. पण त्याने घरच्यांचा विरोध डावलून वसईतील एव्हरशाईन सिटी येथे भाड्याच्या घरात राहिला. तो आई-वडील आणि लहान भावाच्या संपर्कात होता.
2011 मध्ये त्याने 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तो व्यवसाय करण्यासाठी पुण्यात आला. काही महिन्यांनी तो परत मुंबईला आला आणि व्यवसाय व्यवस्थापनाचे शिक्षण घेण्यासाठी पुन्हा प्रवेश घेतला.त्याने तेही शिक्षण अर्धवट सोडून दिले.
यानंतर आफताबने ग्राफिक डिझायनर म्हणून काम सुरु केले. 2019 मध्ये, तो एका डेटिंग अॅपवर श्रद्धाला भेटला. त्याला बाइक्स आणि ट्रेकिंगची आवड होती. श्रद्धालाही हे आवडले त्यामुळे दोघेही एकमेकांकडे आकर्षित झाले. जेव्हा श्रद्धा आणि आफताबने लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आफताब याआधीही दुसऱ्या मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता, असंही त्याच्या मित्राने सांगितले.
आफताब श्रद्धासोबत दिल्ली येथे शिफ्ट होणार आहे, याची माहिती मिळताच त्याच्या घरच्यांनी विरोध केला होता.