शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

Shraddha Murder Case:फॉरेन्सिक तपासणीत मोठा खुलासा; आफताबच्या बाथरुममध्ये मिळाले रक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 2:10 PM

मुंबईच्या श्रद्धा वायकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता दिल्ली पोलिसांना या प्रकरणी मोठा पुरावा मिळाला आहे.

मुंबईच्या श्रद्धा वायकर हत्याकांड प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आता दिल्ली पोलिसांना या प्रकरणी मोठा पुरावा मिळाला आहे. आफताब राहत असलेल्या फ्लॅटमधील बाथरूममध्ये रक्त आढळले आहे.

फॉरेन्सिक तपासणीत आफताबच्या बाथरूममध्ये रक्त सापडल्याचे समोर आले आहे. आफताबच्या बाथरुमच्या टाइल्सवर रक्ताचे डाग आढळून आले आहेत. यापूर्वी  किचनमधून काही रक्ताचे डागही आढळून आले होते. एफएसएलच्या तपासाशिवाय पोलिसांनी अधिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या सीएफएसएलकडून पुरावेही गोळा केले होते. मात्र, सीएफएसएलचा अहवाल येण्यासाठी दोन आठवडे लागणार आहेत.

आफताबची नार्को टेस्ट करण्यापूर्वी पॉलिग्राफ टेस्ट होणार आहे. साकेत न्यायालयाने सोमवारी परवानगी दिली. दिल्ली पोलिसांनी यासाठी तयारी पूर्ण केली आहे. गरजेनुसार आफताबची पॉलीग्राफ चाचणी केव्हाही करता येणार आहे. डॉक्टर आणि तज्ज्ञांची टीमही पूर्णपणे तयार आहे. आफताबची पॉलीग्राफ चाचणी केल्यानंतर नार्को चाचणी केली जाईल. आफताबने दोन्ही चाचण्यांसाठी संमती दिली आहे.

भयंकर! आफताबच्या संपर्कात आलेल्या 'त्या' मुलींचं नेमकं काय झालं?; श्रद्धा हत्याकांडात 'नवा ट्विस्ट'

काल आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती, असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं आहे. तसेच आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे. 

आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. अख्खा तलाव रिकामा केला, मात्र श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.

दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस