श्रद्धा हत्याकांड प्रकरणात रोजच्या रोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या हत्याकांडातील आरोपी आफताब हत्येशी संबंधित अनेक गुपिते पोलिसांसमोर बोलत आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांना पुरावे गोळा करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत आहे. आफताबला मेहरोलीच्या जंगलात नेऊन ते श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एढेच नाही, तर पोलीस छत्रपूर परिसरातील सीसीटीव्हीचे मॅपिंगदेखील करत आहेत. ही हत्या होऊन 6 महिने झाले आहेत. यामुळे पोलीस 6 महिन्यांचे रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी सीसीटीव्हीचे रेकॉर्डिंग फारतर 15 दिवसांपर्यंत असते. यामुळे अशा स्थितीत 6 महिने जुने रेकॉर्ड शेधणे पोलिसांसाठी आव्हान आहे.
काही कॅमेऱ्यांमध्ये आफताब त्याच्या घराकडे जाताना दिसत आहे. हे काही दिवसांपूर्वीचेच सीसीटीव्ही फुटेज आहे. या फुटेजच्या आधारे, या दिवसांत तो कोणा कुणाला भेटत होता, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आफताबची शेवटची नोकरी गुरुग्राममधील एका कॉल सेंटरमध्ये होती. येथे 6-7 दिवस गैरहजर राहिल्यामुळे त्याला टर्मिनेट करण्यात आले होती. तर दुसरीकडे, आफताबचे कुटुंबीय पोलिसांना न सांगताच कुण्यात दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाल्याचे वृत्त होते. मात्र, ते तसे नाही. ते दिल्ली पोलिसांच्या संपर्कात आहेत.
ब्रेकअपचा प्लॅनही झाला होता -चौकशीदरम्यान आफताब म्हणाला, त्याचे श्रद्धासोबत अनेक वेळा भांडण झाले होते आणि त्याने रागाच्या भरातच श्रद्धाची हत्या केली. आफताब आणि श्रद्धाचे गेल्या तीन वर्षांपासून भांडण सुरू होते. त्यांनी अनेक वेळा ब्रेकअपचा प्लॅनही केला होता. एवढेच नाही, तर त्यांना एकदा ब्रेकअप केलेही होते. 18 मे रोजी घरातील सामान घेण्यावरून या दोघांचे भांडण झाले होते. घराचा खर्च आणि सामान कोणी आणायचे, यावर दोघांत भाष्य व्हायचे. आफताबने चौकशी दरम्यान सांगितले, की त्याला याचा प्रचंड राग आला होता. पण, हे सत्य आहे, की नाही हा तपासाचा विषय आहे.
आफताब आणि श्रद्धा यांच्यात 18 मे रोजी सायंकाळी भांडण सुरू झाले आणि 8 ते 10 वाजेदरम्यान त्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली. त्याने श्रद्धाचा मृतदेह रात्रभर त्याच्या रूममध्येच ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी तो चाकू आणि फ्रीज विकत घेण्यासाठी घरा बाहेर पडला. खरे तर, आफताबला शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी पोलिसांना आणखी बरेच काम करावे लागणार आहे. अद्याप या प्रकरण वापरण्यात आलेले शस्त्र जप्त करण्यात आलेले नाही. श्रद्धाचा मोबाईलही अद्याप सापडलेला नाही. तीचे डोकेही अद्याप सापडलेले नाही. याशिवाय, आफताब आणि श्रद्धा यांनी हत्या झाली त्या दिवशी जे कपडे परिधान केले होते, ते कपडेही अद्याप सापडलेले नाहीत. हे कपडे एका कचऱ्याच्या गाडीत फेकण्यात आले होते.