श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. श्रद्धासारखच आणखी एक हत्या प्रकरण दिल्लीत समोर आलं आहे. पोलिसांना एका मुलीचा मृतदेह हा धाब्याच्या फ्रिजमध्ये सापडला. पोलिसांनी आरोपीला अटक करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणाची दिल्लीतील बाबा हरिदास नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याघटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहिल गहलोत असं आरोपीचे नाव आहे. आरोपी मुलाची चौकशी सुरू आहे. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह ढाब्याच्या फ्रिजमध्ये लपवून ठेवला होता. पोलिसांनी फ्रिजमधून मुलीचा मृतदेह बाहेर काढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कश्मीरी गेट आयएसबीटीजवळ कारमध्ये मुलीची गळा आवळून हत्या करण्यात आली.
आरोपीने यानंतर मृतदेह मित्राऊ गावातील ढाब्याच्या फ्रिझमध्ये लपवून ठेवला. आरोपी मुलाचे वय 26 वर्षे आहे. आरोपीची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाचा प्रियकर आफताब याने तिची दिल्लीतील मेहरौली येथे हत्या केल्याचा आरोप आहे. आफताबने गेल्या वर्षी 18 मे रोजी श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे करण्यात आले.
मृतदेह ठेवण्यासाठी आफताबने फ्रीज विकत घेतला होता. यामध्ये त्याने मृतदेहाचे तुकडे ठेवले. तो रोज रात्री श्रद्धाच्या मृतदेहाचा तुकडे मेहरौलीच्या जंगलात टाकण्यासाठी जात असे. इतकंच नाही तर श्रद्धाच्या हत्येनंतरही आफताब त्याच फ्लॅटमध्ये राहत होता. आफताबला पोलिसांनी 12 नोव्हेंबरला अटक केली होती. पॉलीग्राफी टेस्ट आणि नार्कोमध्येही आफताबने श्रद्धाचा खून केल्याची कबुली दिली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"