नवी दिल्ली - श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात दिल्ली पोलिसांनी अहोरात्र एक करत निर्धारित वेळेत म्हणजेच ७५ दिवसांत ६ हजार पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. घटनेच्या दिवशी म्हणजे १८ मे रोजी काय घडले? त्या दिवशी श्रद्धा आणि आफताबमध्ये असे काय घडले की त्याने त्याच्या प्रेयसीची हत्या केली. त्याने केवळ खूनच केला नाही तर निर्दयीपणे तिच्या मृतदेहाचे तुकडे केले या सर्व गोष्टीही समोर आल्या आहेत.
नेमकं काय घडलं? हे जाणून घेण्याआधी घटनेच्या एक दिवस अगोदर अखेर झाले होते. वास्तविक श्रद्धा आणि आफताबची भेट बंबल या डेटिंग अॅपद्वारे झाली होती. यानंतर दोघेही एकमेकांच्या जवळ आले त्यानंतर दोघे एकत्र राहू लागले. काही काळाने दोघेही मुंबई सोडून दिल्लीत आले. आफताबची नोकरीही दिल्लीत सुरू होती.
१७ मे २०२२दिल्लीत आल्यानंतरही ते APP श्रद्धा वालकरच्या मोबाईलमध्ये होते. ती आताही वापरत होती, यादरम्यान ती हरियाणातील गुरुग्राममध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला त्या अॅप्लिकेशनद्वारे भेटली. ही एकमेव व्यक्ती होती, ज्याला भेटण्यासाठी श्रद्धा १७ मे २०२२ रोजी गुरुग्रामला जात होती. त्या दिवशी सकाळीच ती घरातून निघून गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, श्रद्धा त्या नवीन मित्राला भेटण्यासाठी पहिल्यांदा गुरुग्रामला गेली होती.
१८ मे २०२२गुरुग्रामला गेल्यानंतर त्या संध्याकाळी श्रद्धा घरी परतली नाही. श्रद्धा कुठे गेली अशी आफताबला काळजी वाटत होती. मोबाईलवरही ती उत्तर देत नव्हती. त्यामुळे आफताब रात्रभर अस्वस्थ होता. पण दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ मे २०२२ रोजी सकाळी ११ वाजता श्रद्धा छतरपूरच्या फ्लॅटवर परतली. पोलिसांना १८ मेचे सीसीटीव्ही फुटेजही मिळाले आहे, ज्यामध्ये श्रद्धा फ्लॅटमध्ये शिरताना दिसत आहे. फ्लॅटच्या आत शिरताच आफताब समोर आला. तो आधीच रागावला होता. श्रद्धाला पाहताच आफताबला राग अनावर झाला. त्याने रात्रभर कुठे होतीस असा प्रश्न विचारला आणि तू रात्री परत का आला नाहीस? असं म्हटलं. श्रद्धाचा गळा आवळून खूनश्रद्धा वालकरनं प्रत्युत्तर दिले. तुला काय करायचंय? मला वाटेल ते करेन. श्रद्धाचे उत्तर ऐकून आफताब संतापला आणि त्याने श्रद्धाला मारहाण केली. मात्र, काही वेळाने दोघेही नॉर्मल झाले. यानंतर दोघांनी ऑनलाइन जेवण ऑर्डर केले. संध्याकाळ झाली होती, पण रात्री जेवण्यापूर्वी आफताब पुन्हा एकदा श्रद्धावर रात्री न परतल्याने संतापला. दोघांची भांडणे सुरू झाली. त्यानंतर आफताबने श्रद्धाला खाली पाडून तिच्या छातीवर बसला आणि श्रद्धाचा गळा दाबून खून केला.