मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आफताबवर जेलमध्ये करडी नजर ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून तो आत्महत्या करू शकतो अशी भीती पोलिसांना आहे. यामुळे आफताबवर नीट लक्ष ठेवलं जात असल्याचं माहिती समोर आली आहे.
आफताब स्वत:ला नुकसान पोहोचवू शकतो अशी कोणतीही गोष्ट त्याच्या जवळ ठेवू नका अशा सूचनाच जेलमधील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आफताब जेल क्रमांक ४ मध्ये बंदिस्त आहे. त्याचा विक्षिप्त स्वभाव लक्षात जेल प्रशासनाने हे पाऊल उचललं आहे. पोलीस कोठडीत आफताब अत्यंत शांत असल्याने पोलिसांना आश्चर्यही वाटत आहे. आफताबच्या कोठडीत दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून, त्यांनाही त्याच्यावर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. आफताबने चांगली झोप काढली असून त्यांच्याशी गप्पाही मारल्या आहेत. दरम्यान आफताबची पुन्हा एकदा पॉलिग्राफी चाचणी होणार आहे. यानंतर त्याची नार्को चाचणी केली जाईल.
तिहार जेलमध्ये 'अशी' गेली आफताबची पहिली रात्र; आरामात झोपला, चेहऱ्यावर नव्हतं टेन्शन अन्...
खळबळजनक! "श्रद्धाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा केला वापर"; आफताबचा धक्कादायक खुलासा
तिहार जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब सकाळी सहा वाजता उठला आणि नाश्ता केला. जेलमधील कर्मचाऱ्यांशी बोलताना त्याला आपल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप वाटत असल्याचं दिसत नव्हतं. यावेळी त्याने त्याच्यासहित कोठडीत बंद असणाऱ्या दोघांना जेलमधील प्रक्रियेबाबत विचारणाही केली. "आफताबने त्यांना आपण पहिल्यांदाच जेलमध्ये आलो असून, जेवणाचा दर्जा, वेळा आणि इतर सुविधांबाबत जाणून घ्यायचं असल्याचं सांगितलं" अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याला चालण्यासाठी बाहेर जायचं होतं, पण जोखीम पाहता त्याची विनंती फेटाळण्यात आली.
"मी आफताबला 15 वर्षांपासून ओळखतो पण तो..."; मित्राने केला मोठा खुलासा, श्रद्धाबद्दल म्हणाला...
'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं?कैदी अनेकदा एकमेकांशी आपण केलेल्या गुन्ह्याबद्दल चर्चा करत असतात. पण जेव्हा त्याला श्रद्धाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा तो शांत बसला अशी माहितीही दिली आहे. दरम्यान कोठडीतील दोन्ही कैद्यांना आफताबसह त्याच्या गुन्ह्याबद्दल चर्चा न करण्यास सांगण्यात आलं आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जर आफताबला कोठडीतून बाहेर जायचं असेल तर कारागृहाचे दोन कर्मचारी सतत त्याच्यासह असणार. दरम्यान कारागृह अधिकाऱ्यांना मिळालेल्या सूचनेनुसार, आफताबला 28, 29 नोव्हेंबर आणि 2 डिसेंबरला चाचणीसाठी नेण्यात येणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"