शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

Shraddha Walker Murder Case: 'कोणीतरी भडकवलं असेल, तिसरा व्यक्तीही असू शकतो'; आफताबच्या वकिलाचा अजब दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 4:39 PM

Shraddha Walker Murder Case: आफताबला न्यायालयात उपस्थित करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे.

नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड (Shraddha Walker Murder Case) प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.

'आफताब गळा दाबून मारहाण करतोय'; दोन वर्षांपूर्वीच श्रद्धाने पोलीस ठाण्यात तक्रार केलेली, पण...

आफताबला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्याने श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली आहे. रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केली. त्यादिवशी मी जे काही केलं ती Heat Of The Moment होती असं आफताबने न्यायालयातील न्यायाधीशांना म्हटलं आहे. तसेच आफताबच्या कोठडीत ४ दिवसांची वाढ देखील करण्यात आली आहे. 

आफताबच्या वकिलांनी न्यायालयात मात्र अजबच दावा केला. आफताबचे वकिल म्हणाले की, त्याने  Heat Of The Moment होती. त्यामुळे त्याच्या हातून ही हत्या झाली, असं म्हणतोय. मात्र आफताबला कोणीतरी भडकवलं देखील असेल. त्यामुळे त्याला भयंकर राग आला आणि त्याच्या हातून हत्या झाली. तसेच या घटनेत तिसरा व्यक्तीचाही समावेश असू शकतो, असा अजब दावा आफताबच्या वकिलांनी केला आहे.

आफताबचा जबाब अन् संपूर्ण यंत्रणा कामाला लागली; अख्खा तलाव रिकामा केला, पण...

आफताबची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. याचदरम्यान त्याने श्रद्धाचं शिर एका तलावात टाकल्याचे चौकशीदरम्यान सांगितले. त्यानंतर पोलिसांनी छतरपूर जिल्ह्यात मैदान गढी तलावातील पाणी उपसणे सुरू केले होते. याशिवाय पाणबुड्यांना पाचारण करण्यात आले होते. अख्खा तलाव रिकामा केला, मात्र श्रद्धाचे शिर अद्याप सापडलेले नाही.

दरम्यान, आफताबने अतिशय शांत डोक्याने १८ मे रोजी श्रद्धा हिची हत्या केली होती. यानंतर ५ जून रोजी आफताबने वसईतील एव्हरशाइन येथील भाड्याच्या घरातील सामान दिल्लीत मागवले होते. मीरा रोड येथील एका कंपनीला हे काम दिले होते. कंपनीच्या गोविंद यादव याची दिल्ली पोलिसांनी चौकशी करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे. त्याने सामान शिफ्ट करताना झालेल्या व्यवहाराची पावती पोलिसांना दिली असल्याची माहिती मिळत आहे. दिल्लीला सामान शिफ्ट करण्यासाठी २० हजार रुपये आफताबने गुगल-पेद्वारे भरले होते. एक आठवड्यात आम्ही सामान दिल्लीला पाठवले, असे यादव याने पोलिसांना सांगितले.

आफताबची नार्को चाचणी लांबणीवर -

आफताबची नार्को चाचणी तूर्त टळली आहे. नार्कोपूर्वी आफताबची पॉलीग्राफिक चाचणी होईल. ज्यासाठी त्याची संमती आवश्यक आहे, त्याबद्दल पोलिसांना कळविले आहे, असे फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने स्पष्ट केले आहे. या चाचणीत प्रश्न विचारून गुन्हेगाराची रक्तदाब, नाडी, श्वासोच्छ्वास आदींची मोजणी करून त्याद्वारे त्याची मानसिकता याद्वारे तपासली जाते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसCourtन्यायालय