शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

श्रद्धा वालकर हत्याकांड : दिल्लीचे पोलिस वसईतच तळ ठोकून, आतापर्यंत १३ जणांची झाली चौकशी 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 2:54 PM

श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप १३ जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भातही तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.

नालासोपारा : श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिस वसईत तळ ठोकून आहेत. मंगळवारपर्यंत दिल्ली पोलिसांनी १३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. या तपासात पोलिसांना मुंबईशी जोडलेले धागेदोरे सापडले आहेत. श्रद्धा वालकरचा जबडा दिल्ली पोलिसांनी जप्त केला असून, त्यावरून श्रद्धाने रूट कॅनल केले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे रूट कॅनल तिने मुंबईतील डॉक्टरांकडून करून घेतल्याची माहिती आफताबकडून मिळाली. त्यामुळे दिल्ली पोलिस आता मुंबईतील हा डॉक्टर कोण आहे, याचा शोध घेत आहेत. जेणेकरून त्या डॉक्टरचा जबाब नोंदवला जाऊ शकेल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

श्रद्धा वालकरच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अद्याप १३ जणांचे जबाब नोंदवले. श्रद्धाला २०२० मध्ये झालेल्या मारहाणीसंदर्भातही तीन जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास करून पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिस सलग पाच-सहा दिवस झाले तरी वसईत तळ ठोकून आहेत. आफताबने २०२० मध्ये श्रद्धाला मारहाण केली होती. त्यावेळी ती नालासोपारा येथील ओझॉन रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. याप्रकरणी एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेच्या मदतीने तिने पोलिसांत तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पुरावे गोळा करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी ओझॉन रुग्णालयाचे डॉ. शिवप्रसाद शिंदे तसेच समाजिक कार्यकर्त्या पूनम बिडलान यांचे जबाब नोंदवले आहेत, असे सांगण्यात आले. 

अन्य तीन प्रेयसींना बोलावले चौकशीसाठीश्रद्धा आणि आफताब नायगाव येथील एका इमारतीत भाड्याच्या सदनिकेत राहत होते. त्याच्या मालकाचाही जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. तसेच आफताबचे आईवडील वसईतील ज्या सोसायटीत राहत होते, त्या सोसायटीच्या अध्यक्षाचादेखील जबाब नोंदवण्यात आला. तसेच आफताब आणि श्रद्धाचे मित्र-मैत्रिणी गॉडवीन आणि शिवानी म्हात्रे, राहुल रॉय, मूव्हर्स अँड पॅकर्सच्या यादवसह कॉल सेंटर मॅनेजरचा दिल्ली पोलिसांनी जबाब नोंदवून घेतला आहे. दिल्ली पोलिसांनी आफताबच्या तीन अन्य प्रेयसींनाही चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळत आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसMumbaiमुंबई