मुंबईच्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. आफताब पूनावालाच्या २० पेक्षा जास्त मैत्रिणी असल्याचे समोर आले आहे. आफताबने या मुलींसोबत डेटींग अॅपवरुन ओळख केल्याचे समोर आले आहे, यातील एका मुलीने दिल्ली पोलिसांसमोर आफताब संदर्भात काही खुलासे केले आहेत. श्रध्दाच्या हत्येनंतर ही तरुणी दोनवेळा आफताबच्या फ्लॅटवर त्याला भेटल्याची माहिती तिने दिली आहे.
आफताबच्या घरी जेव्हा तरुणी गेली होती, तेव्हा त्याच्या फ्रीजमध्ये तिला मृतदेह दिसला नसल्याचे सांगितले. आफताब पूनावालाने स्वत:च श्रद्धा वालकरची हत्या केल्याची कबुली पॉलीग्राफ टेस्टमध्ये दिली आहे. मृतदेह लपवण्यासाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे ३५ तुकडे करून जंगलात वेगळे फेकून दिले. मृतदेह त्याने घरातच एका मोठ्या फ्रिजमध्ये ठेवला होता. या हत्येनंतर त्याने दुसऱ्या मैत्रिणीलाही फ्लॅटवर बोलावले होते. आफताबने तिला श्रद्धाची अंगठीही भेट दिली होती. व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असल्याचं बोलल्या जाणाऱ्या तरुणीने हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर तिला मोठा धक्का बसल्याचे सांगितले.
"19 वर्षांनी मोठा असलेला पती औषधे घेऊन ठेवत होता लैंगिक संबंध", पत्नीची पोलिसांत तक्रार
आफताब पूनावाला वेगवेगळ्या डेटिंग अॅप्सद्वारे फसवणूक करून इतर मुली आणि महिलांना डेट करत असल्याचे समोर आले. या तपासातून बंबल अॅपच्या माध्यमातून एका तरुणीला गर्लफ्रेंड बनवून फ्लॅटवर आणल्याचेही समोर आले आहे. श्रद्धाच्या हत्येच्या 12 दिवसांनंतर 30 मे रोजी आफताबच्या संपर्कात आलेल्या मुलीने चौकशीदरम्यान पोलिसांना माहिती दिली.
पोलीस तपासात आफताब अनेक डेटिंग अॅप्सवर सक्रिय असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्लॅटफॉर्मवर सुमारे 10-15 मुलींशी तो बोलत होता. आफताबच्या नवीन प्रेयसीने पोलीस चौकशीत सांगितले की, आफताबने तिला मुंबईतील घर आणि कुटुंबाबाबतही सांगितले होते. आफताबला परफ्युमची खूप आवड होती. आफताबने मुलीला परफ्यूमही भेट दिला. सध्या या मुलीचे समुपदेशनही केले जात आहे.