शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना सापडलं; चौकशीत आफताबचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 8:30 AM

Shraddha Walker Murder Case : नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. रोज याबाबत नवनवीन माहिती ही समोर येत आहे. पोलिसांना या हत्या प्रकरणात आता अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आफताबने श्रद्धाचे 35 तुकडे केले 'ते' हत्यार पोलिसांना अखेर सापडलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीत आफताबने चायनीज चॉपरने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचं समोर आलं आहे. आरोपी आफताब पूनावाला याची पॉलिग्राफ आणि नार्को चाचणी पूर्ण झाली. नार्को टेस्ट दरम्यान आफताबने श्रद्धाच्या हत्येबाबतची अनेक रहस्य उघड केल्याची माहिती मिळत आहे.

आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर सर्वात प्रथम तिच्या हाताचे तुकडे केले होते. नार्को टेस्टमध्ये त्याने तुकडे फेकून दिल्याचं सांगितलं. पोलीस आता त्या लोकेशनवर जाऊन हत्याराचा शोध घेत आहेत. पोलिसांनी आफताबच्या फ्लॅटमधून अनेक धारदार हत्यारं जप्त केल्याचा दावा केला आहे. या हत्यारांचा वापर हा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी केला गेला. आता पोलीस आफताबने हे चॉपर नेमकं कुठून खरेदी केलं याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 

"श्रद्धाचे 35 तुकडे केल्यानंतर आफताब 12 महिलांच्या संपर्कात होता, काहीजणी आलेल्या फ्लॅटवर"

18 मेच्या आधी हे हत्यारांची खरेदी केली नव्हती ना? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. जर त्याने त्याआधी हत्यारं घेतल्याचे पुरावे मिळाले तर त्याने कट रचून श्रद्धाची हत्या केल्याचं सिद्ध होईल. याच दरम्यान आफताब सातत्याने रागाच्या भरात श्रद्धाची हत्या केल्याचं म्हणत आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर अनेक महिने आफताबने तिचा मोबाईल आपल्याकडे ठेवला होता. मुंबई पोलिसांनी जेव्हा त्याला चौकशीसाठी बोलावलं तेव्हा त्याच्याकडे तो फोन होता. पण त्यानंतर त्याने श्रद्धाचा फोन मुंबईच्या समुद्रात फेकल्याचं म्हटलं आहे. आजतकने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

: "...म्हणून मी संतापलो अन् श्रद्धाची हत्या केली"; नार्को टेस्टमध्ये आफताबसोबत नेमकं काय घडलं?

नार्को चाचणीदरम्यान आफताबने डॉक्टरांच्या टीमला सांगितले की, श्रद्धाने आपल्याला सोडून जाण्याची धमकी दिली होती. यामुळे तो संतापला आणि त्याने श्रद्धाची हत्या केली. याशिवाय आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कसे केले आणि त्याची विल्हेवाट कशी लावली हे देखील सांगितले. पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरांनी आफताबला विचारले की त्याने श्रद्धाचे शिर कुठे लपवले आहे, तेव्हा तो ते ठिकाण सांगू शकला नाही. त्याने शिर नक्की कुठे लपवलं होतं हे त्याला आठवत नव्हतं. आफताबने श्रद्धाची हत्या कशी केली? त्याने तिचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले आणि शरीराचे विविध अवयव कुठे फेकले. आफताबचे जबाब हे पोलीस आणि पॉलीग्राफ चाचणीत झालेले खुलासे यांच्याशी जुळत असल्याचे सूत्रांनी सांगितलं. रागाच्या भरात त्याने श्रद्धाची हत्या केल्याचं आफताबने सांगितलं होतं.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी