श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात रोज नवीननवीन खुलासे समोर येत आहेत. या हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. दिल्ली पोलिसांना या प्रकरणात महत्त्वाची माहिती मिळाली आहे. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी त्याने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, दिल्लीला जाण्यापूर्वी वसई भागातील त्यांच्या घरातून सामान नेण्यासाठी पैसे कोण देणार यावरून त्यांचे आणि श्रद्धाचे भांडण झाले होते. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीच्या माध्यमातून आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी मुंबईहून दिल्लीला आपले सामान हलवले होते. 37 बॉक्समधून हे सामान दिल्लीला आणण्यात आलं.
श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...
पोलीस अधिकारी तपास करत आहेत की, या सामानामध्ये काय आणले होते? आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या गोष्टींचा वापर केला होता का? याशिवाय 20 हजार रुपये कुणाच्या खात्यातून कुरिअर कंपनीला ट्रान्सफर केले? कारण आफताबच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही आणि श्रद्धाचं शिर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही. त्यामुळे कुरिअर केलेलं सामान अत्यंत महत्त्वाचं आहे.
आफताबच्या संपर्कात आलेल्या 'त्या' मुलींचं काय झालं?; श्रद्धा हत्याकांडात 'नवा ट्विस्ट'
दिल्ली पोलिसांच्या एका टीमने रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका पॅकेजिंग कंपनीच्या कर्मचाऱ्याचा जबाब नोंदवला. आफताबने वसईच्या एव्हरशाईन शहरातील व्हाईट हिल्स सोसायटीमधील त्याच्या फ्लॅटमधून 37 बॉक्समधून सामान ट्रान्सफर केल्याचे उघड झाले. या प्रकरणातील पुरावे शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी आपली टीम महाराष्ट्र, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशातही पाठवली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"