Shraddha Walker Murder Case: संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या श्रद्धा हत्याकांड प्रकरणी एकामागून एक नवीन खुलासे होत आहेत. हत्या करणारा आरोपी आफताब अमीन पूनावालाची (Aftab Poonawalla) क्रूरता पाहून सर्वांनाच हादरवून सोडले आहे.
'दररोज नवीन अनुभव...'; श्रद्धाची 'ती' पोस्ट ठरली अखेरची, दोघंही गेलेले हिमाचल प्रदेशात!
श्रद्धा आणि आफताबची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली होती. त्यानंतर दोघेही लिव्ह इन-रिलेशनमध्ये राहू लागले. दोघंही वसई येथील रहिवाशी असल्याने त्यांचं जास्त जुळून आलं. दोघंही जास्त जवळीक येण्याचं हेच एक कारण ठरल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच लग्नाच्या बहाण्यानं श्रद्धाला आफताब दिल्लीत घेऊन गेला होता. अनेक दिवस उलटल्यानंतर श्रद्धाने लग्नासाठी तगादा लावल्यामुळे आपण कंटाळून तिची हत्या केल्याची कबूली दिली आहे. तसेच तिचे ३५ तुकडे करुन, दिल्लीच्या परिसरात फेकल्याची माहितीही त्याने दिली आहे.
पोलिसांची टीम आफतबच्या घरी; एक पुतळा अन् क्राइम सीन रिक्रिएट, नेमकं काय घडलं?, पाहा
आपल्या २६ वर्षीय मुलीची तिच्या लिव्ह-इन पार्टनरने अत्यंत निर्दयीपणे हत्या करून तिचे ३५ तुकडे केले, ही अंगावर शहारे आणणारी घटना आहे. प्रेमात पडलेल्या आपल्या मुलीने आपले ऐकले असते, तर कदाचित आज ती जिवंत असती, अशी खंत तिचे वडील विकास मदन वालकर यांनी व्यक्त केली आहे. मी मुलीला खूप समजावले; पण तिने ऐकले नाही. स्वतःचे निर्णय स्वतःच घेईन, असा हट्ट तिने केला होता, असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितले.
श्रद्धाने एक-दोन वेळा माझ्याशी चर्चा केली. तेव्हा तिचा आफताबशी वाद सुरू असल्याचे समजले. त्यावेळी एकदा ती घरीही आली. तेव्हा आफताब आपल्याला मारहाण करत असल्याचे तिने सांगितले. त्यानंतर मी तिला घरी परतण्याचे सांगितले; पण आफताबने समजूत काढल्यानंतर पुन्हा ती त्याच्यासोबत गेली. श्रद्धा आफताबला भेटण्यापूर्वी पूर्णपणे वेगळी होती. ती अतिशय प्रेमळ आणि महत्त्वाकांक्षी होती. पण आफताबला भेटल्यानंतर श्रद्धा बदलली, असं श्रद्धाच्या वडिलांनी सांगितलं. तसेच आफताबला भेटल्यानंतर श्रद्धामध्ये अनेक बदल झाले. ती आमची श्रद्धा राहिली नव्हती, असं श्रद्धाच्या मित्रांनी सांगितलं. तसेच लग्नासाठी आफताबवर दबाव टाकला असेल, असंही वाटत नाही, असा खुलासा श्रद्धाच्या मित्रांनी केला. श्रद्धाच्या वडील आणि मित्रांच्या या दाव्यामुळे पोलिसांसह अनेकजण बुचकळ्यात पडले आहेत.
श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले-
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे.
दोन स्टेटमेंटमध्ये तफावत-
आफताब आणि त्याच्या आईला माणिकपूर पोलिसांनी श्रद्धाच्या गायबप्रकरणी पोलिस ठाण्यात ३ नोव्हेंबरला बोलावले होते. आरोपी आफताब याचे ३ नोव्हेंबर आणि त्याआधी दोन वेळा स्टेटमेंट घेतले. पण दोन्ही स्टेटमेंटमध्ये तफावत आढळल्याने माणिकपूर पोलिसांना संशय आल्याने ७ नोव्हेंबरला दिल्लीला गेले होते.