‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येत आहेत. मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. रिलेशनशिपच्या काही महिन्यातच आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.
आफताबने आता पोलिसांसमोर धक्कादायक खुलासा केला आहे. श्रद्धाच्या हत्येतील आरोपी आफताबने पोलिसांना श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी अनेक हत्यारांचा वापर करण्यात आला होता असं सांगितलं आहे. तसेच गेल्या काही दिवसांत, पोलिसांनी 5 मोठे चाकू जप्त केले आहेत जे तपासासाठी फॉरेन्सिक टीमकडे पाठवण्यात आले आहेत अशी माहिती दिल्ली पोलीस सुत्रांनी दिली आहे.
दिल्ली पोलीस भाईंदरच्या खाडीत शोधताहेत पुरावे
महाराष्ट्रातील ठाणे (ग्रामीण) भाईंदर खाडी परिसरात दिल्ली पोलिसांचे पथक पुरावे शोधत आहेत. श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी आफताबने आपल्या वसई येथील घरातून 37 बॉक्स हे दिल्लीला पाठवले होते. या 37 बॉक्समध्ये नेमकं काय सामान होतं याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. एका कुरिअर कंपनीच्या माध्यमातून त्याने बॉक्स दिल्लीला पाठवले होते. तसेच त्यासाठी पैसेही दिले होते. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताबने दिल्ली पोलिसांना सांगितले होते की, दिल्लीला जाण्यापूर्वी वसई भागातील त्यांच्या घरातून सामान नेण्यासाठी पैसे कोण देणार यावरून त्यांचे आणि श्रद्धाचे भांडण झाले होते. आता पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
श्रद्धाच्या आईची शेवटची इच्छा होती लेकीचं लग्न; आफताबच्या घरी वडील बोलणीसाठी गेले पण...
'ते' 37 बॉक्स उलगडणार आफताबचं रहस्य; श्रद्धा हत्याकांडात नवा 'ट्विस्ट', नेमकं काय घडलं?
गुडलक पॅकर्स अँड मूव्हर्स कंपनीच्या माध्यमातून आफताबने श्रद्धाची हत्या केल्यानंतर दोन आठवड्यांनी मुंबईहून दिल्लीला आपले सामान हलवले होते. 37 बॉक्समधून हे सामान दिल्लीला आणण्यात आलं. पोलीस अधिकारी तपास करत आहेत की, या सामानामध्ये काय आणले होते? आफताबने श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी या गोष्टींचा वापर केला होता का? याशिवाय 20 हजार रुपये कुणाच्या खात्यातून कुरिअर कंपनीला ट्रान्सफर केले? कारण आफताबच्या आई-वडिलांचा अद्याप शोध लागलेला नाही आणि श्रद्धाचं शिर अजूनही पोलिसांना सापडलेलं नाही. त्यामुळे कुरिअर केलेलं सामान अत्यंत महत्त्वाचं आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"