नेपाळहून फरार अल्पवयीन भाऊ-बहिणीला पोलिसांनी छुपरामधून ताब्यात घेतलं. दोघेही एका कंपनीमध्ये आपली खरी ओळख लपवून पती-पत्नी बनून काम करत होते. सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल झाला तेव्हा त्यांच्या परिवाराला याबाबत समजलं. त्यानंतर त्यांना घेण्यासाठी ते छपरा येथे आले. सगळेच पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आणि तिथे बराच वेळ ड्रामा सुरू राहिला. बरंच समजावल्यानंतर ते घरी परत जाण्यास तयार झाले.
दोन्ही भाऊ-बहिणींना पोलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अजब प्रकार घडला. आशिका (16) आणि आयुष (17) ने आधी तर आपल्या आई-वडिलांना ओळखण्यास नकार दिला. नंतर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला जो बराच वेळ चालला. बराच वेळ आई-वडील आणि मुलांची चर्चा झाली. तेव्हा कुठे दोघेही आपल्या आई-वडिलांसोबत जाण्यास तयार झाले.
मुलांची आई तुलासा विकने सांगितलं की, एक महिन्याआधी दोघेही अचानक गायब झाले होते. त्यांना आजूबाजूला खूप शोध घेण्यात आला. पण काही पत्ता लागला नाही. स्थानिक न्यूज पोर्टलच्या मदतीने दोघांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. छपरातील एका व्यक्तीने दोघेही इथेच असल्याची माहिती पोलिसांना दिली.
तुलासा वीकने सांगितलं की, दोघांची माहिती मिळाली तर आम्ही छपरा येथे पोहोचला आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना शोधलं. त्यांनी पुढे सांगितलं की, दोघेही भाऊ-बहीण कौटुंबिक वादामुळे घरातून पळून गेले होते. पण ते छपरामध्ये कसे पोहोचले आणि त्यांना नोकरी कशी मिळाली हा चौकशीचा विषय आहे.