Goldy Brar connection with lady don Anuradha: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नंतर या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर गोल्डी बरारने घेतली होती. तो सध्या कॅनडात आहे आणि तिथूनच आपली गॅंग ऑपरेट करतो. आता गोल्डी बरारच्या राजस्थान कनेक्शनचा खुलासा झाला आहे. समोर आलं की, ती राजस्थानची लेडी डॉन अनुराधाचाही (Lady Don Anuradha) क्राइम पार्टनर होता.
कोण आहे लेडी डॉन अनुराधा?
अनुराधा (Don Anuradha) मूळची राजस्थानच्या सीकरची राहणारी आहे. अनुराधा बालपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिच्याकडे बीसीएची डिग्रीही आहे. अनुराधाचं लग्न दीपक मिन्ज नावाच्या तरूणासोबत झालं होतं आणि लग्नानंतर दोघांन शेअर ट्रेडिंगचं काम सुरू केलं होतं. मात्र, मोठं नुकसान झाल्यानं दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर अनुराधाने गुन्हे विश्वात पाउल ठेवलं आणि आपल्या पतीला सोडलं होतं.
आनंदपालसोबत जुळलं नाव
पतीला सोडल्यानंतर अनुराधा हिस्ट्रीशीटर बलबीर बानूडाच्या माध्यमातून राजस्थानचा कुख्यात गॅंगस्टर आनंदपालच्या संपर्कात आली. असं म्हटलं जातं की, दोघांमध्ये जवळचं नातं होतं. असं सांगितलं जातं की, अनुराधानेच आनंदपालचा पेहराव बदलला होता आणि त्याला इंग्रजी बोलणं शिकवलं होतं. तर आनंदपालने अनुराधाला एके-४७ चालवण्याचं ट्रेनिंग दिलं होतं.
नंतर बिश्नोई गॅंगसोबत जुळली
२०१७ मध्ये पोलिसांनी एका एन्काउंटरमध्ये आनंदपालला जीवे मारलं आणि त्यानंतर अनुराधाने लॉरेन्स बिश्नोईची गॅंग जॉइन केली. यादरम्यान काला जठेडी आणि गोल्डी बरार अनुराधाच्या संपर्कात आले होते. असं सांगितलं जातं की, अनुराधाने गोल्डीसोबत मिळून इंटरनॅशनल क्राइम सिंडिकेट तयार केला होता.
अनुराधाच्या गॅंगमध्ये गोल्डी बरार
३१ जुलै २०२१ ला जेव्हा अनुराधा आणि काला जठेडीला पकडण्यात आलं तेव्हा समजलं होतं की, दोघांनी लग्न केलं आहे. दरम्यान पोलिसांनी खुलासा केला होता की, अनुराधाने गॅंगस्टर काला जठेडीसोबत मिळून आपल्या विरोधकांचा सफाया केला होता. अटकेनंतर अनुराधाने तिच्या गॅंगच्या सदस्यांची नावेही सांगितली होती. ज्यात गोल्डी बाबर याचंही नाव होतं. अनुराधा आता राजस्थानच्या अजमेर तुरूंगात कैदेत आहे.