शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
Akola: किरकाेळ वादातून आमदार नितीन देशमुख यांच्या पुत्राला मारहाण, पाेलिसांत तक्रार दाखल
3
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
4
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
5
विधानसभा निवडणूक लढवलेला नेता निघाला कार चोरी करणाऱ्या टोळीचा सदस्य, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
6
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
7
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
8
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
9
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
10
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
11
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
12
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
13
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
14
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
15
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
16
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
17
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
18
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
19
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
20
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार

Sidhu Moose Wala Murder: एकानं समोरून झाडल्या गोळ्या, १०० राऊंड फायर, अशी झाली मूसेवालाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 3:10 PM

Sidhu Moose Wala Murder: अवघ्या 2 मिनिटात मुसेवालावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी केवळ 2 मिनिटे घटनास्थळी थांबले.

पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला ज्या ठिकाणी गोळ्या झाडल्या त्या ठिकाणी पोलीस पोहोचल्यानंतर सखोल तपास केला. या घटनेचा प्रत्यक्षदर्शी प्रिन्सही भेटला होता. सायंकाळी 5 ते 5.30 च्या दरम्यान ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. अवघ्या 2 मिनिटात मुसेवालावर 30 गोळ्या झाडण्यात आल्या. आरोपी केवळ 2 मिनिटे घटनास्थळी थांबले.दोन वाहने येतात, एक बोलेरो आणि दुसरी लांबलचक गाडी. दोन्ही वाहनांनी मूसेवालाच्या थारला ओव्हरटेक केले. मुसेवाला आपल्या कारला सांभाळत असताना 7 तरुण दोन्ही कारमधून खाली उतरले आणि अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबार करताना, ते 1 ते 2 मिनिटे जागेवरच राहतात, नंतर पळून जातात.पहिली गोळी थारच्या मागील टायरला लागलीप्रत्यक्षदर्शी प्रिन्सने सांगितले की, आरोपींनी आधी मूसेवाला यांच्या गाडीच्या मागील टायरला गोळी मारली. त्यामुळे गाडीचा तोल बिघडतो. यामध्ये आरोपींनी ओव्हरटेक केल्यानंतर कारमधून खाली उतरून गोळीबार सुरू केला. मुसेवाला आणि त्याच्या दोन मित्रांना सावरण्याची संधीही मिळत नाही. गोळीबाराचा आवाज ऐकून लोक घराबाहेर पडतात, मात्र हल्लेखोरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून ते घरात घुसतात.

घटनास्थळी सुमारे 30 गोळ्या लागल्याप्रत्यक्षदर्शी प्रिन्सने सांगितले की, हल्लेखोरांनी अशा प्रकारे गोळीबार केला, जणू ते ठरवूनच आले होते की, आज फक्त मूसेवालाच संपवायचा आहे. हल्लेखोरांनी सुमारे 30 राउंड फायर केले. प्रिन्सच्या म्हणण्यानुसार, त्याने आणि त्याच्या मित्राने पोलिसांना घटनास्थळावरून गोळ्यांचे शेल शोधण्यात मदत केली.मूसेवालाचे रक्त अजूनही भिंतींवर आहेखून झालेल्या जव्हार गावातील गल्लीतील भिंतींवर मुसेवालाच्या रक्ताच्या आणि गोळ्यांच्या खुणा अजूनही आहेत. गावातील कोणीही मुसेवाला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला नाही. कोणी बाहेर आले नाही. एका अज्ञात व्यक्तीने मुसेवाला यांना त्यांच्या मोटरसायकलवरून रुग्णालयात नेले, तेथे त्यांचा मृत्यू झाला.तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचलेप्रिन्सच्या प्रत्यक्षदर्शीनुसार, मुसेवाला यांची हत्या झाल्याचे संपूर्ण जगाला समजले. यानंतर मानसा पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनेनंतर तासाभराने पोलीस आले. पोलीस तात्काळ सक्रिय झाले असते तर कदाचित आरोपी मानसाच्या बाहेर जाऊ शकले नसते, असे प्रिन्स सांगतो.चेक्स शर्ट घातलेल्या तरुणाने गोळीबार केलाप्रिन्सने सांगितले की, चेक्स शर्ट घातलेला एक तरुण होता, त्याच्याकडे एके ४७ होती. या तरुणाने मुसेवाला यांच्यावर गोळीबार केला होता. उर्वरित 6 तरुणांनी इकडे-तिकडे गोळीबार करून त्याला कव्हर करून दहशत पसरवण्याचे काम केले. घटनास्थळी एक तरुण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असताना हल्लेखोरांनी त्या तरुणावरही गोळीबार केला. घाबरलेल्या तरुणाने घटनास्थळावरून पळ काढला.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFiringगोळीबारPoliceपोलिसPunjabपंजाबDeathमृत्यू