पुणे : स्मार्ट फोन वापरताना थोडासा निष्काळजीपणा केल्यास ही चोर तुमच्या सीम कार्डमधील सर्व माहिती क्लोन व स्वॅपिंगद्वारे मिळवून तुमचे बँक खाते रिकामे करु शकते. ते ही अगदी काही मिनिटात. सायबर चोरांनी सध्या चोरीसाठी ही नवीन शक्कल शोधली आहे. सायबर पोलीस ठाण्यात आतापर्यंत अशा ५ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.कोणत्याही कंपनीचे सिमकार्ड सायबर चोरटे सहजपणे स्वॅप करु शकतात. त्यामुळै अनोळखी व्यक्तीशी बोलताना खास करुन मोबाईल कंपनीचा प्रतिनिधी असेल तर केलेली छोटीशी चुक आपल्याला मोठा आर्थिक फटका देऊ शकते. त्यामुळे एखाद्या टेलिकॉम कंपनीच्या नावे फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने सिमकार्डनंबर विचारला तर तो कोणत्याही परिस्थितीत सांगू नका. सायबर पोलीस ठाण्यातअशा प्रकारे ५ गुन्हे दाखल असल्याचे सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले.............................
काय आहे सिम स्वॅपिंग....या प्रकारामध्ये एखाद्या सिम कार्डचे डुप्लिकेट सिमकार्ड तयार केले जाते. कॉल करणारा आपण मोबाईल कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून कॉल ड्रॉप, इंटरनेट स्पीड आदी त्रुटी दूर करण्याची बतावणी करुन तुमची माहिती काढून घेतो.त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक २० अंकी सिमकार्ड नंबर चा एसएमएस पाठवितो. हा एसएमएस तुमच्या मोबाईलवर न १२३४५ या क्रमांकावर फॉरवर्ड करण्याससांगतो. हा एसएमएस फॉरवर्ड केल्यानंतर तुमचे सिमकार्डचे नेटवर्क बंद होऊनतुमचा मोबाईल क्रमांक आरोपीकडील सिमकार्डवर सुरु होतो. त्यामुळे आपल्या बँकेकडून येणारे ओ टी पी व एस एम एस याचा वापर करुन आरोपी आपल्या बँक खात्यातून पैसे काढून घेतो. अशा प्रकारे नागरिकांची फसवणुक केली जाते. बहुतांश प्रकरणात फोन करणार्या व्यक्तीकडे आपला बँकिंग आयडी आणि पासवर्ड असतो. त्यांना फक्त ओ टी पी नंबरची गरज असते. तो सिम नंबरवर येतो. ओ टीपी येताच आपल्या बँक अकाऊंटमधून रक्कम ट्रान्सफर केली जाते. या सिम स्वॅपिंगद्वारे काही मिनिटात तुमच्या बँक खात्यात असलेली सर्व रक्कम काढून घेतले जाऊन तुमचे बँक खाते रिकामे केले जाते. एका प्रकरणामध्ये तक्रारदार याच्या खात्यावर कर्ज काढण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे........याबाबत जयराम पायगुडे यांनी ग्राहकांनी काय काळजी घ्यावी, त्याचा सूचनादिल्या आहेत.
* कोणतीही मोबाईल कंपनी ग्राहकांना अशा प्रकारे फोन करुन माहिती विचारत नाही.* फसवणूक करणारी व्यक्ती ही महाराष्ट्राच्या बाहेरील इतर राज्यातून बोलत असते. त्यामुळे कोणताही फोन आल्यावर तो कोठून बोलत आहे, हे लक्षात येते.* सिमकार्डच्या मागील सिम कार्ड नंबर हा गोपनीय असून तो कधीही कोणाशी शेअर करु नये.* सिम नंबर कोणत्याही अनोळखी नंबरवर फॉरवर्ड करु नये. तसेच आपली खासगी माहिती सोशल मिडियावर अपलोड करु नये.* असा प्रकार आपल्याबरोबर घडल्या तात्काळ आपल्या टेलिफोन कंपनीच्या केअरशी व बँकेशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी. बँक खात्याशी लिंकअसणारा मोबाईल क्रमांक बदलून घ्यावा किंवा बंद करावा.