उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या महानगरमध्ये व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आली आहे. ज्यात बहिणीच्या मदतीने दोन भाऊ अश्लील व्हिडीओ कॉल करवत होते. व्हिडीओ कॉल दरम्यान तरूणी लोकांचे कारनामे रेकॉर्ड करत होती आणि जेव्हा लोक जाळ्यात अडकत होते तेव्हा त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं.
हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा महानगरचा एक व्यापारी या बहिणीच्या आणि तिच्या दोन भावांच्या जाळ्यात अडकला. आरोपींनी व्यापाऱ्याकडे ३० कोटी रूपयांची मागणी केली होती. महानगरच्या एसएचओंनी माहिती दिली की, गेल्या १५ जूनला व्यापारी आणि तरूणीत चॅटींग सुरू झाली होती. चॅटींग सुरू करण्याआधी एका अनोळखी नंबरवरून 'हाय' असा मेसेज व्यापाऱ्याला पाठवण्यात आला होता. (हे पण वाचा : ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या)
एसएचओनुसार, नंतर त्याच नंबरवरून व्हिडीओ कॉल आला आणि नंतर व्हिडीओ कॉलमध्ये महिलेने अश्लीलता सुरू केली. यादरम्यान तरूणीने व्यावसायिकाला फसवून सगळं काही रेकॉर्ड केलं आणि नंतर त्याच नंबरवरून तरूणीचा भाऊ मोहितने कॉल करून व्यापाऱ्याकडे ५ कोटी रूपयांची मागणी केली.
व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितलं की, ते म्हणाले होते की, जर पैसे दिले गेले नाही तर त्याच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना हा व्हिडीओ पाठवून बदनाम केलं जाईल. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने ब्लॅकमेलरला ५ लाख रूपये देण्यास तयारी दाखवली. यानंतर फोनवरून ब्लॅकमेल करणारा मोहित सिंह आपला मोबाइल बंद करून आपल्या मोठ्या बहिणीकडे गेला. (हे पण वाचा : Shocking! १४ कोटींची लॉटरी जिंकल्यावर ९ महिन्यांनी पतीने पत्नी-मुलीची केली हत्या, नंतर केली आत्महत्या)
एसएचओंनी सांगितलं की, जेव्हा तरूणीने बघितलं की, तिचा भाऊ मोहितचा मोबाइल बंद आहे तर तिला वाटलं की, तिच्या भावाने व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली नसेल. त्यामुळे ब्लॅकमेलर तरूणीने आपल्या मामे भावाला विवेक सिंहला व्यापाऱ्याला फोन करण्यास सांगितलं. त्याने व्यापाऱ्याला फोन करून शिव्या देऊन ३० कोटी रूपयांची मागणी केली.
डीसीपी उत्तरी देवेश पांडे यांनी सांगितलं की, खंडणी मागितल्यावरून व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्या दोन नंबरवरून ब्लॅकमेल करण्यात आलं ते नंबरही त्याने पोलिसांना दिले. नंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी मोहित सिंह आणि विवेक यांना अटक केली. दोन्ही आरोपींची बहीण फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.