शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

ताई मला वाचव!  हबीब मला मारून टाकेल; रिदाने मृत्यूपूर्वी केला होता व्हिडिओ कॉल, म्हणाली होती...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2020 5:55 PM

बहिणीच्या तक्रारीवरून डीएलएफ फेज-II पोलिसांनी रिदाचा प्रियकर हबीब याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देविशेष म्हणजे मृत्यूआधीच मुलीने अलिगडमध्ये आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला. कृपया मला वाचवा .. मी मरेन ... हबीब माझा जीव घेईल. हे शेवटचे शब्द होते तरन्नुमच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्याच्या अटकेनंतर संपूर्ण सत्य समोर येईल.

अलीगड - गुरुग्राममध्ये राहणाऱ्या इंटिरियर डिझाइन कंपनीची सीनियर सेल्स मॅनेजर असलेल्या २८ वर्षीय रिदा मसरूर चौधरी, हिची शनिवारी रात्री तिच्या खोलीत गळा आवळून हत्या करण्यात आली. ती अलिगड क्वार्सी भागातील केला नगरची होती. बहिणीच्या तक्रारीवरून डीएलएफ फेज-II पोलिसांनी रिदाचा प्रियकर हबीब याच्याविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे मृत्यूआधीच मुलीने अलिगडमध्ये आपल्या बहिणीला व्हिडिओ कॉल केला. कृपया मला वाचवा .. मी मरेन ... हबीब माझा जीव घेईल. हे शेवटचे शब्द होते. जे इंटीरियर डिझाईन कंपनी वाओ स्पेस ई-कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सीनिअर सेल्स मॅनेजर रीदा मसरूर चौधरी हिने ११ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे रडत तिच्या मोठ्या बहीण तरन्नुम मसरूर चौधरी हिला सांगितले. फक्त ३० सेकंदाच्या कॉलवर, तरन्नुमने छोटी बहीण रीदाला तिला होणारा त्रास विचारत धैर्याने काम करण्यास सांगितले. दरम्यान, फोन डिस्कनेक्ट झाला. सुमारे १० - १२ वेळा कॉल करूनही फोन आला नाही. सकाळी ११ वाजता रिदाच्या मृत्यूची बातमी मिळाली.रिदा डिझाईन कंपनीत सिनिअर सेल्स मॅनेजर होती

क्वार्सी विभागातील केला नगर येथील सेंट्रल टॉवरच्या डी ब्लॉक-Block ३०४  येथे राहणारी आणि खासगी शाळेत शिक्षिका असलेल्या तरन्नुम मसरूर चौधरी यांनी सांगितले की, वडील डॉ. चौधरी एमए खान हे आखाती देशातील सेवानिवृत्त डॉक्टर होते. रीदा चौधरी एक भाऊ आणि चार बहिणींमध्ये सर्वात लहान होती. २०१० मध्ये तिचे लग्न कोलकाता येथे राहणाऱ्या एका तरूणाशी झाले होते. जवळपास सहा वर्षांनंतर, दोघांमध्ये एक गैरसमज झाला आणि त्यांनी घटस्फोट घेतला आणि स्वतःचा मार्ग निवडला. जवळजवळ दोन वर्षे, रीदा गुरुग्राममधील एका डिझाईन कंपनीत सिनिअर सेल्स मॅनेजर म्हणून कार्यरत होती. शवविच्छेदन अहवालातही रिदाच्या शरीरावर अनेक जखमांच्या खुणा सापडल्या आहेत. रिदाचा मोबाइल फोनही गायब आहे. पोलीस तपासात सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआरही सापडलेले नाही. रीदाने गुरुग्राम सोडून अलिगडमध्येच राहण्याचा निर्णय घेतला होता. रविवारी रात्री तो अलिगडला येणार होता. सोमवारी तरन्नुमच्या मुलाच्या वाढदिवशी ती उपस्थित राहणार होती. वर्षभरापूर्वी हबीब बॉयफ्रेंड झालाअलिगडमधील केला नगर येथे असलेल्या सेंट्रल टॉवरची रहिवासी रिदा चौधरी डीएलएफ फेज -3 मध्ये राहत होती. तिचा घटस्फोट झाला होता. वर्षभरापूर्वी हबीबशी मैत्री झाली होती. त्याने अविवाहित असल्याचा दावा करत रिदाशी लग्न करण्याचे वचन दिले. काही महिन्यांपूर्वी रीदाला समजले की, हबीब विवाहित आहे आणि त्यांना मुलगा आहे, रीदा त्याच्यापासून विभक्त होऊ इच्छित होती. मात्र, हबीब सोडायला तयार नव्हता. या दोघांमध्ये वाद वाढला होता. रिदाची मोठी बहीण तरन्नुम मसरूर चौधरी यांनी सांगितले की, शनिवारी (हत्येच्या रात्री) साडेनऊच्या सुमारास रिदाने तिला व्हिडिओ कॉल केला होता. त्यावेळी ती खूप अस्वस्थ होती. असे दिसते की, ती एखाद्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. मध्येच फोन कट झाला. याची माहिती दिल्लीच्या द्वारका येथे राहणारी आपली बहीण सीमा हिला दिली. या प्रकरणाची माहिती सीमाने तातडीने पोलिसांना दिली. रात्री पोलिस घटनास्थळी पोहोचले असता दरवाजा उघडा होता आणि रिदाचा मृतदेह मजल्यावर पडला होता. रिदाचा प्रियकर हबीबने खून केल्याचा आरोप तरन्नुमने केला आहे. खोलीत पंख्याने बांधलेली साडी लटकली होती. यावरून असे सूचित होते की, हत्येनंतर आत्महत्या केल्याचा बनाव रचण्याचा कट असावा. सहाय्य्क पोलीस आयुक्त प्रीतपाल यांनी सांगितले की, तरन्नुमच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे. त्याच्या अटकेनंतर संपूर्ण सत्य समोर येईल.

 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

एमबीएचा विद्यार्थी निघाला गुन्हेगार, दोघांना ३ पिस्तुलांसह अटक 

 

वादग्रस्त साहिलची ऑडिओ क्लिप व्हायरल, पोलिसांकडून जागोजागी छापेमारी

 

बनावट प्रोफाईल तयार करून मार्केटिंग करणाऱ्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

 

माझी संपत्ती विकून देणं देऊन टाका; आम्हा सर्वांचे अवयव दान करा !

 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या पप्पू यादव यांना अमित शाहांनी दिलं असं उत्तर

 

निंदनीय प्रकार भोवला! मनसेच्या अविनाश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस