सदानंद नाईक
उल्हासनगर : फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यामध्ये तरुणाला नोकरीचे आमिष दाखवून ऑक्टोबर २०२० ते २१ मार्च २०२१ दरम्यान साडे सहा लाखाला गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात रामेश्वर नेरकर यांच्या तक्रारीवरून निलेश पाचपुते व सतीश ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल केला.
उल्हासनगर कॅम्प नं-४ संभाजी चौक परिसरात राहणारे रामेश्वर नेरकर कुटुंबासह राहत असून त्यांच्या मुलाला फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये नोकरीला लावून देण्याचे आमिष तोंड ओळखीचे असलेले निलेश पाचपुते व सतीश ठाकरे यांनी दाखविले. ऑक्टोबर २०२० ते २१ मार्च २०२१ दरम्यान दोघांनी नेरकर यांच्याकडून साडे सहा लाख रुपये नोकरीला लावून देण्याच्या आमिषाने घेतले. मात्र एक वर्ष होऊनही मुलाला नोकरी लागली नाही. याभितीने त्यांच्या मनात शंका आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात निलेश पाचपुते व सतीश ठाकरे यांच्या विरोधात बुधवारी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांनी अन्य जणांना असेच फसविले का? याबाबत चौकशी करीत आहेत.