शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

खैराची तस्करी करणारे सहा अटकेत; सुधागड तालुका वनविभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 12:10 AM

वाहनांसह मुद्देमाल केला जप्त

पाली : सुधागड तालुक्यात खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक व तस्करी होण्याची प्रकरणे समोर येत आहेत. सोमवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास पाली-खोपोली राज्य महामार्गावर कानसळ गावाजवळ सुधागड वनविभागाच्या कारवाईत खैराच्या लाकडाची अवैध वाहतूक व तस्करी करणाऱ्यांना पकडण्यात आले, तसेच या कारवाईत दोन वाहने व मुद्देमाल जप्त करण्यात आला.

उपवनसंरक्षक अलिबाग व सहायक वनसंरक्षक अलिबाग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधागड समीर शिंदे, वनपाल खंडपोली बी.जी. दळवी वनरक्षक आर.पी टिके, एस.डी. शिंदे, एस.ए. डोंगरे, आर.जे. राक्षे, बी. एम. हाटकर, एस.व्ही. पोले, एम.एस पाटील, जे. एम. गायकवाड यांनी ही कारवाई केली आहे. वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सोमवारी, २४ आॅगस्ट रोजी सुधागड वनक्षेत्रातील कानसळ गावाजवळ पाली-खोपोली मार्गावर गस्त करीत असताना, पहाटे ५.३० वाजता एका पिकअप वाहनामधून खैराची लाकडे एका ट्रकमध्ये भरत असल्याचे वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. खैर लाकडाबाबत पिकअप वाहनचालक नरेंद्र रघुनाथ वारंगे (तोरणपाडा) तालुका सुधागड यांच्याकडे विचारणा केली असता, खैर झाडाचे तुकडे ट्रक चालक निजाम हुसेन पटेल (राहणार चिपळूण) यांच्या सांगण्यावरून महागाव येथून आणल्याचे त्यांनी सांगितले. खैर लाकडाबाबत वनविभागाच्या वाहतूक परवाना घेतला आहे का? याबाबत विचारणा केली असता, तो नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला, तसेच पिकअप वाहन चालक नरेंद्र रघुनाथ वारंगे (रा. तोरणपाडा, ता. सुधागड), ट्रकचालक निजाम हुसेन पटई (रा. चिपळूण) बळीराम मारुती हिलम, बाळू गंगाराम पवार, नारायण धोंडू घोघरकर, रमेश भिकू हिलम सर्व राहणार भोप्याची वाडी यांना अटक केली आहे.जप्त केलेला मुद्देमालया छाप्यात निळ्या रंगाची ताडपत्री असलेला ट्रक, त्यामधील २९ खैराच्या लाकडाचे तुकडे, पिकअप गाडी त्यामधील २७ खैराच्या लाकडाचे तुकडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.