शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

खंडणी म्हणून मागितली बीएसयूपीतील सहा घरे, कार्यालयीन अधीक्षकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2023 9:29 AM

आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला.

ठाणे : बीएसयूपी योजनेतील सहा सदनिकांची खंडणीच्या रूपाने मागणी करून ती न दिल्यास चॉपरने जीवे मारण्याची धमकी ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे कार्यालयीन अधीक्षक महेश आहेर (५५) यांना सौरभ वर्तक याच्यासह दोघांनी दिल्याने खळबळ उडाली आहे. आहेर यांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी दिली. 

आहेर २ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौपाडा येथील नोंदणी कार्यालयाजवळील अनधिकृत बांधकामाची पाहणी करण्यासाठी जात होते. त्याचवेळी सौरभ आणि त्याचा अन्य एक साथीदार यांनी आपसात संगनमत करून त्यांचा जाण्याचा मार्ग अडवला. सौरभशी त्यांचा कोणताही व्यवहार झालेला नसताना धर्मवीरनगर, तुळशीधाम येथील बीएसयूपी प्रकल्पातील सहा फ्लॅट हे खंडणी स्वरूपात द्यावेत. ते न दिल्यास चॉपरसारखे हत्यार पोटात खुपसून तुला ढगात पाठवेन, अशी धमकी सौरभने आहेर यांना दिली. यावेळी सौरभने चॉपर  दाखवून इतर लोकांना तिथून जाण्याचा इशारा करीत धमकावले. त्यामुळे तिथे जमलेले लोक पळून गेले. तसेच एका व्यक्तीच्या व्हॉट्सॲपवर नोव्हेंबर २०२१ मध्ये सौरभ आणि इमरान यांच्या संभाषणातही त्यांनी आहेर यांना मारण्याचा इशारा देत शिवीगाळ केली होती. 

त्यानंतर सहा फ्लॅटच्या खंडणीसाठी धमकविल्यामुळे आहेर यांनी ५ जानेवारी रोजी नौपाडा पोलिस ठाण्यात खंडणीसह, धमकी देणे, शिवीगाळ करणे आणि  सरकारी कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल केला आहे. यातील आरोपी अन्य एका गुन्ह्यात आधीच अटक असल्यामुळे त्याला या गुन्ह्यातही अटकेची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका