शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

ॲसिड हल्ला करण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाला सहा महिने सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 8:20 PM

'मोबाईल नंबर दे, नाही तर दोघी जणींवर ॲसिड फेकेन' अशी द्यायचा धमकी

सचिन भोसले, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: शालेय विद्यार्थींनाचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी वाईट वर्तन केले. मोबाईल नंबर दे नाहीतर दोघीजणींवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. या प्रकरणी आरोपी विक्रम उर्फ विकी राजेंद्र पोलादे (वय ३९, रा. तस्ते गल्ली, मंगळवार पेठ) यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी सहा महिने सक्तमजूरी व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा शुक्रवारी सुनावली.

खासबाग येथील खाऊ गल्ली आणि पद्माराजे शाळा ते गांधी मैदान मार्गावर १ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आरोपी विक्रम उर्फ विकी पोलादे याने एका अल्पवयीन शालेय विद्यार्थीनाचा पाठलाग केला. त्याच कुटूंबातील आणखी एका मुलीचा हात पकडून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बरेचदा पोलादे याने मुलीचा पाठलाग करून मोबाईल क्रमांक देण्याची मागणी केली. या मागणीकडे संबधित मुलींनी दुर्लक्ष केले. त्याने रागाच्या भरात दोन्ही मुलींवर ॲसिड फेकण्याची धमकी दिली. याविरोधात मुलीच्या आईने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानूसार पोलिसांनी आरोपी पोलादे यास अटक करून न्यायालयात हजर केले. त्याच्याविरोधात अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम.बी. तिडके यांच्या न्यायालत खटला सुरु होता.

या खटल्यात विशेष सरकारी वकील अमिता कुलकर्णी यांनी सहा साक्षीदार तपासले. यात फिर्यादी , पिडीत मुली आणि इतर साक्षीदारांच्या साक्षी आणि जबाबा महत्वाचे ठरले. ॲड. कुलकर्णी यांनी केलेला युक्तीवाद आणि उच्च व सर्वोच्च न्यायालयातचे निवाडे ग्राह्य मानून न्यायाधीश एम.बी.तिडके यांनी आरोपी पोलादे यास दोषी ठरवत सहा महिने सक्तमजूरी आणि पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. याकामी वकील कुलकर्णी यांना जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सतीशकुमार गुरव, तपासी अधिकारी महिला पोलिस उपनिरीक्षक टी.आर. पाटील, पैरवी अधिकारी सहायक फौजदार जर्नादन खाडे, पोलिस हवालदार अशिष पाटील, महिला पोलिस हवालदार माधवी संजय घोडके यांचे सहकार्य लाभले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर