सचिन राऊत, अकोला: आकाेट फाइल व डाबकी राेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील दाेन आराेपींना सहा महीन्यांसाठी तडीपार केलेले असतानाही ते शहरातच असल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेने दाेघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर दाेन्ही आराेपींविरुद्ध तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी डाबकी राेड व आकाेट फैल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाेट फैल परिसरातील लक्ष्मी काॅलनी येथील रहिवासी इरफान अहमद उर्फ लंबा इरफान सइद अहेमद वय ३५ वर्ष यास उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार केले हाेते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करत ताे आकाेट फैल परिसरात फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. यावरुन आराेपीस ताब्यात घेउन त्याच्याविरुद्ध आकाेट फेल पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्याला आकाेट फैल पाेलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
डाबकी राेडवरील खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी ताैहीद खान समीर खान याला उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशाने सहा महिन्यांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले हाेते मात्र, या आदेशाचे उल्लंघन करीत ताे डाबकी राेडवर असल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन डाबकी राेड पाेलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याविरुद्ध तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस अधिक्षक संदिप घुगे यांच्या मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.