भिवंडी : भिवंडीत वाहन चोरीच्या घटनांचे सत्र थांबता थांबत नसून एकाच दिवसात सहा वाहनांची चोरी झाल्याचे गुन्हे रविवारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यात निलेश गोपाळ पाटील वय ३५ वर्ष रा. वेताळ पाडा यांनी फुलेनगर येथे रस्त्याच्या कडेला त्यांची ड्रीम युगा ही दुचाकी पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली आहे. याप्रकरणी निलेश पाटील यांनी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दुसऱ्या घटनेत ज्ञानेश्वर तुकाराम राऊत वय २५ वर्ष रा. गायत्री नगर यांनी आपली होंडा कंपनीची शाईन मोटरसायकल गायत्री नगर येथील ॲक्सिस बँकेच्या एटीएम जवळ पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे, याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिसऱ्या घटनेत मयूर जगन्नाथ सोळंके व २९ वर्ष रा. काल्हेर यांनी होंडा कंपनीची होर्नेट मोटरसायकल राहत्या घराजवळ पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे, याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चौथ्या घटनेत संतकुमार रामविलास कुमार गौंड वय २८ वर्ष रा. काल्हेर या रिक्षा चालकाची ऑटो रिक्षा काल्हेर येथे पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याप्रकरणी संतकुमार याने नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पाचव्या घटनेत शोएब अहमद इरफान अहमद अन्सारी वय २३ वर्ष राहणार धामणकर नाका याने त्याची मोटरसायकल मेहता कंपाऊंड येथील महाराष्ट्र हॉटेलच्या बाजूला असलेल्या पान टपरी जवळ पार्क करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
याप्रकरणी शोएब याने भोईवाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर सहाव्या घटनेत मोहम्मद मेहता अबालमलाल मोहम्मद हाश्मी वय २७ वर्ष याने त्याची मोटरसायकल पिरानी पाडा, शांतीनगर येथे शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घराखाली पार्क करून ठेवले असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली याप्रकरणी मोहम्मद मेहता यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.