कोरोना काळ संपल्यानंतर विमान वाहतूक पूर्ववत झाली असून विमानतळावर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यातच, आंतरराष्ट्रीय हवाई अड्ड्यावरही प्रवाशांनी मोठी वर्दळ दिसून येते. याच वर्दीळीतून सोन्याच्या तस्करीचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या काही दिवसांता देशातील विविध विमानतळांर कस्टम विभागाने सोन्यासह इतही वस्तूंची तस्करी रंगेहात पकडली आहे. मुंबई विमानतळावर चालू वर्षांत आतापर्यंत तब्बल ६०४ किलो सोने जप्त करण्यात तपास यंत्रणांना यश आले आहे. त्यातच, आता केरळमधील कोची विमानतळावर आणखी जवळपास ४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलंय.
विदेशातून सोनं तस्करीचे प्रमाण अधिक वाढल्याचे स्पष्ट होत आहे. सोन्याची पेस्ट करून तस्करी करण्याचा नवा फंडा स्मग्लरांनी शोधला आहे. त्यातच, सोन्याच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आणि भारतात १५ ते २० टक्क्यांचा फरक आहे. तसेच, इंपोर्ट ड्युटी, एक्सोपर्ट ड्युटी, टॅक्स इत्यादी बाबींमध्येही फायदा होतो, त्यामुळे ही सोनं तस्करी वाढत आहे. कोची विमानतळावरही कस्टम विभागाने आज तब्बल ४.८ किलो ग्रॅम सोनं हस्तगत केलं आहे. वेगवेगळ्या तीन जणांकडून हे सोनं जप्त करण्यात आलं असून या सोन्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २.१० कोटी रुपये एवढी आहे.
दरम्यान, हे सोनं पेस्ट करुन ४ गोळे करुन भारतात आणण्यात आलं होतं.