मीरा रोड : मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांच्या कन्या स्नेहा सकलेजा यांना मिठाईचे ऑनलाइन पैसे देताना सायबर लुटारूंनी ८० हजार रुपयांना गंडा घातला आहे. ४८० रुपयांची मिठाई त्यांना ८० हजारांना पडली. या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
स्नेहा यांना त्यांच्या सासू प्रतिभा सकलेजा यांनी फोन करून सांगितले की, तिवारी ब्रदर्सकडून ऑनलाइन ऑर्डरने मिठाई मागविली असून, त्याचे ऑनलाइन ४८० रुपये क्यूआर कोडद्वारे द्यायचे आहेत. स्नेहा यांनी क्यूआर कोड पाठविण्यास सांगितले असता, सासू यांनी तो पाठविला. त्या क्यूआर कोडवर स्नेहा यांनी जीपेद्वारे ४८० रुपये भरले स्नेहा यांना व्हॉट्सॲपवर अनोळखी क्रमांकावरून कॉल आला आणि आपण तिवारी ब्रदर्समधून बोलत असून, तुम्ही जे ४८० रुपये भरले, त्याचे जीएसटीसाठी नोट हवे आहे, असे सांगितले.
गुन्हा दाखल
स्नेहा यांनी त्याबाबत विचारणा केली असता, समोरच्या व्यक्तीने माफी मागून तुमचे पैसे परत खात्यात जमा होतील, मी सांगतो तसे टाईप करा म्हटले. स्नेहा यांनी पुन्हा त्याप्रमाणे केले असता, त्यांच्या खात्यातून आणखी ३९ हजार ५०६ रुपये कमी झाले. स्नेहा यांनी अनोळखी व्यक्तीला कॉल केला असता, त्याने कट करून नंतर नंबर ब्लॉक केला. या घटनेप्रकरणी स्नेहा यांच्या फिर्यादीवरून नवघर पोलिसांनी शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक केदारे तपास करत आहेत.