मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुंबईत शिवडी क्रॉस रोड येथे लॉकडाऊन असतानाही डबल मर्डरची घटना घडली आहे. शिवडीमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी १२ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर असलेल्या मैदानात बसलेल्या तीन भावंडांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चॉपरने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी अल्पवयीन भाऊ आणि शाहिद पटेलचा मृत्यू झाला तर जखमी झालेला अदनान याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
करीम युसूफ शेख(35), युसूफ उमर शेख (70), मिनाज युसूफ शेख(35), मेहराज युसूफ शेख(65) ही अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. यांनी शिवीगाळ करून हात आणि बुक्काने मारहाण करून धमकी दिली. तसेच करीम युसूफ शेख या आरोपीने त्याच्या हातातील तीक्ष्ण चाकूने अदनान व त्याच्या दोन भावांना वार करून गंभीर जखमी केले त्यांना केईम रुग्णालयात उपचाराकर्ता दाखल केले. तेव्हा दोघांना मृत घोषित करण्यात आले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा. दं. वि. कलम 302,307, 506, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.