२६ जानेवारी रोजी ट्रॅक्टर रॅलीबाबत पोलिसांसोबत झालेल्या कराराचा भंग केल्याबद्दल त्यांच्यावर का कायदेशीर कारवाई केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांना दिल्लीपोलिसांनी नोटीस बजावली आहे. काल पूर्व दिल्ली पोलीस ठाण्यात राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनीशेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय शेतकरी संघटनेचे नेते राकेश टिकैत यांचेही नाव आहे. शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राकेश टिकैत यांच्यासह शेतकरी नेते दर्शन पाल, राजिंदरसिंग, बलबीरसिंग राजेवाल, बूटासिंग बुर्जगिल, जोगिंदरसिंग उग्राहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व शेतकरी नेते कृषी कायद्याविरोधात आंदोलन करत आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या संघटनांनी माघार घेतली आहे.
दिल्ली पोलिसांनी हा एफआयआर नोंदविली आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश टिकैतसह ६ शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर संयुक्त किसान मोर्चानेही यासंदर्भात निवेदन जारी केले आहे. संयुक्त किसान मोर्चातर्फे शेतकरी व मजुरांविरूद्ध हा मोठा कट असल्याचं म्हटलं आहे. संयुक्त किसान मोर्चाचे प्रतिनिधी म्हणतात, आमचे आंदोलन शांततेत सुरू आहे. ज्या लोकांनी हिंसाचार केला आहे, ते लोक आमच्याबरोबरचे लोक नाहीत. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी 200 लोकांना ताब्यात घेतले. लवकरच आणखी लोकांना अटक केली जाईल, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले.