शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

...म्हणून अमली पदार्थांच्या तस्करीसाठी महिलांचा अधिक वापर

By पूनम अपराज | Published: September 20, 2018 8:57 PM

महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

 

मुंबई - अमली पदार्थाविरोधी मोहिमेचा पोलिसांनी चांगलाच फास आवळला आहे. अनेक गुन्हे हे अमली पदार्थाच्या सेवनाआहारी गेल्याने उघड झाल्यानंतर भांडुपमध्ये नागरिकांनी मोठा मोर्चा काढून याला वाचा फोडली होती. अमली पदार्थ पुरविणाऱ्या साखळीवर आघात केल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने शहरातील किरकोळ विक्रेत्यांना रडावर घेतले आहे. त्यातही महिला विक्रेत्यांवर पथकाची विशेष नजर आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात विविध ठिकाणी कारवाया करून पथकाने ११ छोटया-मोठया महिला विक्रेत्यांना बेडया ठोकल्याने या तस्करीत महिला तस्करांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच २०१५ साली मोठ्या प्रमाणावर एमडी हा घटक अमली पदार्थ पुरविणारी वरळीत राहणारी बेबी पाटणकर हे महिला तस्करीतील मोठे नाव आहे.  गेल्या वर्षी अमली पदार्थविरोधी पथकाने एमडीचे उत्पादक, वितरक, बडे पुरवठादारांना शिताफीने अटक केली. त्यापाठोपाठ चरस, गांजा आणि कोकेनच्या वितरण साखळीविरोधात धडक मोहीम उघडली. या साखळीविरोधात सुमारे ६५ गुन्हे नोंद करण्यात आले. आरोपींना अटक केली गेली आणि त्यांच्याकडून मोठया प्रमाणात अमली पदार्थाचा साठा हस्तगत केला गेला. या कारवाईमुळे सध्या अमली पदार्थाचा मोठा साठा पोहचविणारे तस्कर हे माघार भूमिका घेत नकार देतात. या वर्षी विशेषतः जुलै, ऑगस्ट महिन्यांपासून पथकाच्या विविध कक्षांनी हद्दीतल्या किरकोळ प्रमाणातील अमली पदार्थ थेट ग्राहकांना उपलब्ध करून देणार्या विक्रेत्यांची धरपकड सुरू केली आहे.ऑगस्ट महिन्यात पथकाने भांडुप, वरळी, गोरेगाव, सांताक्रूझ, वांद्रे या परिसरात छापे टाकून २१ विक्रेत्यांना अटक केली. त्यात ११ महिलांचा समावेश आहे. वरळी पथकाने नाशिकहून गांजाचा साठा मुंबईत आणणाऱ्या लता चौरे या महिलेला बेडया ठोकल्या. तिच्याकडून १० किलो गांजा हस्तगत केला गेला. लताने गेल्या दोन - एक महिन्यांमध्ये मुंबईच्या १५ ते २० वाऱ्या  केल्या. आरोग्यसेविकेच्या वेशात तिने गांजाचा किरकोळ साठा दडवून मुंबईत आणल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. तिने हा साठा वरळीतल्या किरकोळ विक्रेत्यांच्या मागणीनुसार आणला होता. त्यापैकी राणी बरसैया या महिलेस अटक केली. राणी पूर्वी गावठी दारूचा गुत्ता चालवत असे. मात्र, कालांतराने ती गांजा विक्रीत उतरली.तसेच गावठी दारूचा गुत्ता चालवि़्ाणाऱ्या  बहुतांश महिला सध्या अमली पदार्थ विक्रीत सक्रिय आहेत. कारण नाकाबंदी, धरपकडीत महिलांकडे पाहाण्याचा पोलिसांचा दृष्टिकोन वेगळा असतो. महिला, लहान बालकांना घेऊन प्रवास करणारी वाहने नाकाबंदीतून सहज सुटतात. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तर महिला विक्रेत्या कपडे फाडतात आणि पोलीस पथकावर विनयभंगाचा आरोप करतात असे प्रकार वारंवार मुंबईत घडत असल्याने, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थWomenमहिला