दिल्लीच्या पश्चिम विहारमध्ये सेक्सटॉर्शनचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामध्ये सेक्सटोर्शनच्या नावावर तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची मागणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले होते. तक्रारदाराने दीड लाख रुपये रोख आणि उर्वरित दीड लाख बँक खात्यातून ट्रान्सफरही केले होते.
दिल्लीपोलिसांना ही तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलीस उपनिरीक्षक सीताराम, उपनिरीक्षक मनीष आणि एसीपी अरविंद कुमार यांच्या पथकाने आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचला.भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे रॅकेट सुरू होतेआरोपी पश्चिम विहार परिसरात भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहून असे सेक्सटोर्शन रॅकेट चालवत असल्याची माहिती मिळाली. टेक्निकल सर्व्हिलन्स आणि मिळालेल्या माहितीच्या मदतीने ही टोळी नीरज हा बहादूरगड येथील एक व्यक्ती चालवत असल्याची माहिती मिळाली. या टोळीने पश्चिम विहारमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला होता.पोलिसांनी नीरजच्या अटकेसाठी सापळा रचून प्रशांत विहार येथून त्याला अटक केली. चौकशीदरम्यान, नीरजने त्याची टोळी भोळ्या लोकांना हनीट्रॅपमध्ये अडकवते आणि त्यांना फ्लॅटवर बोलावल्यानंतर व्हिडिओ बनवला जातो. हा अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक केली जात असल्याचं कबुल केलं आहे. लोकांना अडकवण्याचा हनीट्रॅपचा खेळहनीट्रॅपद्वारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवणाऱ्या या टोळीत एका मुलीचाही समावेश आहे. त्याच्या टोळीत ५ सदस्य असल्याचा खुलासा नीरजने केला. आतापर्यंत त्याने डझनहून अधिक लोकांना आपला जाळ्यात अडकवले आहे. प्रत्येक पीडितेकडून पाच ते दहा लाख रुपये उकळले. लॉकडाऊनची पहिली लाट म्हणजेच कोरोना सुरू होताच ही टोळी सुरू झाली.आरोपी मुलीचे प्रोफाईल फेसबुकच्या माध्यमातून मिळवायचा आणि फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तिला बळीचा बकरा बनवला जात असे. अनेकवेळा तरुणी आणि पीडित व्यक्ती खोलीत असताना या टोळीचे लोक पोलीस बनून आत शिरायचे आणि मग ब्लॅकमेलिंगचा खेळ सुरू होत असे. या टोळीशी संबंधित उर्वरित आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.