Rajasthan Crime News : राजस्थानच्या करौलीमध्ये लेडी डॉन रेखा मीणाला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा प्रयास या केसमध्ये रेखा फरार होती. तिला जयपूरच्या रामनगरियामध्ये पोलिसांनी अटक केली. करोलीमध्ये रेखा आणि तिच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल झाला होता.
सोशल मीडियावर पिस्तुलासोबत रील्स बनवणारी लेडी डॉन रेखा मीणा तिच्या विरोधा गॅंगला नेहमीच आव्हान देत होती. असं सांगितलं जातं आहे की, 19 वर्षीय रेखाला लेडी डॉन म्हणवून घेणं आवडत होतं. तिच्या भागातील मोठमोठे बदमाश तिला घाबरत होते. रेखा मीणा आपल्या प्रत्येक मुव्हमेंटची अपडेट सोशल मीडियाववर शेअर करत होती. तिला हजारो लोक फॉलो करत होते.
करौलीला राहणाऱ्या योगेश जादौनने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तो शाळेतून येत होता तेव्हा दुपारी अडीच वाजता अंजनी माता मंदिरजवळ दोन तरूणी आणि चार तरूण दारू पित होते. त्यांना दारू पिण्यास टोकलं तर एका तरूणाने त्याच्यावर गोळी झाडली. ज्यानंतर तो गंभीर जखमी झाला. या केसमध्ये रेखाचंही नाव होतं आणि तेव्हापासून ती फरार होती.
जयपूर ईस्ट डीसीपी राजीव पचार यांनी सांगितलं की, टोडाभीमच्या नांगला लाट येथे राहणाऱ्या आरोपी रेखा मीणाबाबत सूचना मिळाली होती की, ती जयपूरमध्ये आहे. नंतर पोलिसांनी प्लान करून तिला अटक केली.
19 वर्षीय रेखा करौली जिल्ह्यातील टोडाभीम येथील नागल लाट गावात राहणारी आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे आणि वडील कमल मीणा मजुरी करतात. जानेवार 2020 मध्ये रेखा तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने कुख्यात पप्पुलाल मीणा याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी रेख मीणाला अटक केली होती. तेव्हापासून रेखा मीणाला करौलीची लेडी डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 2022 मध्ये फेसबुकवर तिचे अनेक अकाउंट आणि पेज आहेत. त्यावर तिचे फोटो आहेत. रेखा सोशल मीडियावर विरोधकांना थेट आव्हान देते.