कुमार बडदे
मुंब्राः लग्नास नकार देणा-या प्रियकराच्या डोक्यावर हातोडा मारून त्याची हत्या करुन,त्याचा मृतदेह चिखलामध्ये फेकून दिलेली प्रेयसी आणि यातीला मदत केलेल्या तीच्या भावाला शिळ-डायघर पोलिसांनी गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या पंत्र्याच्या पेटीच्या आधारे चोविस तासामध्ये शिताफीने अटक केली.गुरुवारी संध्याकाळी दिवा-शिळ रस्त्या जवळील खाडी पुलाच्या डाव्या बाजूला असलेल्या चिखलामध्ये पत्र्याच्या पेटीमध्ये सडलेल्या अवस्थेत अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.
मृतदेहाबाबत कुठलीही ठोस माहिती नसल्यामुळे तपास करणा-या पोलिस पथकातील पोलिसांनी मृतदेह ज्या पेटीमध्ये आढळून आला होता.तशा पेट्याची विक्री आणि उत्पादनाच्या ठिकाणाचा तपास केली.तपासाअंती गुन्ह्यात वापरलेल्या पेट्या मुंबईतील धारावी येथील डांबर कम्पाउंड येथे बनवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाले.तेथे जाऊन पोलिसांनी जेथून पेटी खरेदी केली होती.त्या उत्पादकांचा शोध घेतला असता मृतदेह ज्या पेटीमध्ये आढळून आला होता ती पेटी एका महिलेने त्याच्याकडून ३० एप्रिलला खरेदी केल्याची माहिती दिली.ज्या महिलेने पेटी खरेदी केली होती.तीचा मोबाईल नंबर त्याच्याकडून घेऊन पोलिसांनी तो ट्रेस केला असता तो नवी मुंबईतील घनसोली परीसरात अँक्टीव्ह असल्याचे माहिती पोलिसांनी मिळाली.तेथे जाऊन पोलिसांनी अनिता यादव या महिलेला ताब्यात घेतले असता तीने तीचा भाऊ विजय भल्लारे (रा.नथानी टाँवर,लेबर कँम्प,मुंबई सेट्रल) याच्या मदतीने दिव्यात रहात असलेल्या मनिष यादव याच्या घरामध्ये तो झोपेत असताना ६ मे ला त्याच्या डोक्यावर हातोड्याने प्रहार करुन त्याची हत्या केली.त्यानंतर पेटीत भरुन मृतदेह खाडीजवळील झाडाझुडपात फेकून दिला.दिड वर्षापासून शारीरिक संबध ठेवलेला मनिष लग्न करण्यास मात्र तयार नव्हता.यामुळे त्याची हत्या केल्याची कबूली दोन्ही आरोपिंनी चौकशी दरम्यान दिली असल्याची माहिती शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी लोकमतला दिली.