शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

अज्ञात महिलेच्या खुनाचा उलगडला गुन्हा, मुलगा आणि पुतण्याने गळा दाबून केला खून

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2019 2:29 AM

पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गटारात १५ दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकलेला पोलिसांना आढळला होता.

नालासोपारा - पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच असलेल्या गटारात १५ दिवसांपूर्वी एका अज्ञात महिलेची निर्घृण हत्या करून मृतदेह फेकलेला पोलिसांना आढळला होता. या महिलेच्या हत्येप्रकरणी पती, सख्या मुलासह पुतण्याला नालासोपारा पोलिसांनी अटक केली आहे. महिलेच्या मृतदेहावर असलेल्या कागदाच्या तुकडयावरून या गुन्ह्याचा उलगडा झाला आहे. पोलिसांनी आरोपी पती राम मिलन प्रजापती (४०), मुलगा महेश आणि पुतण्या महेंद्र उर्फ सूरज प्रजापती यांना अटक केले असून पुढील तपास करत आहे.नालासोपारा पश्चिमेकडील रेल्वे स्टेशनच्या बाजूला असलेल्या गोगटे गणेश मंदिरापासून काही अंतरावर असलेल्या गटारात २१ जानेवारीला अज्ञात महिलेची हत्या करून फेकलेला मृतदेह सापडला होता.पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपासाला सुरु वात केली. कोणताही पुरावा आणि कोणतेही धागेदोरे नसताना ३ टीम वेगवेगळ्या शहरात तपास करीत होत्या. महिलेच्या मृतदेहाच्या कपड्यात कागदाचा तुकडा सापडला होता. या तुकड्यामधील दोन मोबाईल नंबरावरून या तिची ओळख पटवूत हत्येचा उलगडा झाला आहे. कुसुम राम मिलन प्रजापती (३८) असे तिचे नाव आहे.ही हत्या एक रूम आणि चारित्र्याच्या संशयावरून झाल्याचे उघड झाले आहे. पती राम मिलन प्रजापती (४०) यांच्यासोबत तिचे लग्न झाले होते. परंतु ती पती आणि ४ मुलांपासून गेल्या २ वर्षांपासून जटाशंकर चाळ, हवाईपाडा, संतोष भवन येथे एकटी राहत होती. ती साकीनाका येथील गारमेंट्स फॅक्टरीत काम करीत होती. पुढील तपास सुरू आहे.असा आखला कटराम मिलन याने हा रूम मीरा रोड मधील एकाला विकला होता पण कुसुम या रूमवरील कब्जा सोडत नव्हती. तसेच ती वेगळी राहत असल्यामुळे तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. ही रूम परत मिळवण्यासाठी तिघांनी मिळून तिचा काटा काढण्यासाठी प्लॅन आखून तिचा खून केला.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी