मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या, इंटरनेटवर सोशल काढला होता सुपारी किलर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2022 10:19 AM2022-07-26T10:19:50+5:302022-07-26T10:20:47+5:30

Madhya Pradesh Crime News : शिवपुरीमध्ये राहणाऱ्या मुलाने सोशल मीडियाच्या मदतीतून बिहारच्या एका सुपारी किलरला संपर्क केला होता आणि आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी त्याला दिली होती.

Son got father killed Madhya pradesh police arrested him | मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या, इंटरनेटवर सोशल काढला होता सुपारी किलर

मुलाने सुपारी देऊन केली वडिलांची हत्या, इंटरनेटवर सोशल काढला होता सुपारी किलर

Next

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) शिवपुरी जिल्ह्यातून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका तरूणाला सुपारी  देऊन त्याच्या वडिलांची हत्या (Son Killed Father) करण्याप्रकरणी अटक केली आहे. शिवपुरीमध्ये राहणाऱ्या मुलाने सोशल मीडियाच्या मदतीतून बिहारच्या एका सुपारी किलरला संपर्क केला होता आणि आपल्या वडिलांच्या हत्येची सुपारी त्याला दिली होती.

पोलिसांनुसार,  काही दिवसांआधीच महेश गुप्ताची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. सूचना मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमला पाठवला. चौकशीतून समोर आलं की, मृतकाचा एका मुलगा सेनेत होता आणि एक दारूड्या होत्या.

सेनेत असलेला मुलगा संतोषचं निधन झालं होतं आणि दुसरा मुलगा अंकित जुगार, सट्टा खेळतो आणि नशेतही राहतो. यामुळे त्याचं नेहमीच पत्नी आणि वडिलांसोबत भांडण होत राहत होतं. हत्येच्या चौकशी दरम्यान अंकित पोलिसांनी व्यवस्थित माहिती देत नव्हता. पण जेव्हा अंकितचा मोबाइल चेक केला तेव्हा हत्येचा खुलासा झाला.

याप्रकरणी शिवपुरीचे एसपी राजेश सिंह चंदेल यांनी सांगितलं की, मृतकाचा मुलगा अंकितने चौकशी दरम्यान पोलिसांना भरकटवण्याचा प्रयत्न केला. अंकितचे फोन कॉल डिटेल्स आणि इंटरनेट हिस्ट्री तपासली गेली तेव्हा समोर आलं की, अंकितने इंटरनेटच्या माध्यमातून बिहारच्या सुपारी किलरला संपर्क केला होता आणि वडिलांच्या हत्येची सुपारी दिली होती.

आरोपीचा भाऊ संतोष सेनेत होता, ज्याच्या मृत्यूनंतर साधारण 1 कोटी रूपये वडील महेशला मिळाले होते. अंकितची नजर एक कोटी रूपयांवर होती. त्यामुळे त्याने वडिलांना संपवण्याचा प्लान केला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Son got father killed Madhya pradesh police arrested him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.